Mahankali and Manganga Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : सांगलीतील महांकाली, माणगंगा साखर कारखाने बंदच

Sugarcane Season : सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळपास गती आली असून ६० लाख ३४ हजार टन उसाचे गाळप करत ६४ लाख २८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळपास गती आली असून ६० लाख ३४ हजार टन उसाचे गाळप करत ६४ लाख २८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कुंडल क्रांती कारखाना गाळपात आणि साखर उत्पादनात आघाडीवर आहे.

हंगामाच्या मध्यावर जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्यांची चढाओढ सुरू आहे. मात्र, कवठेमहांकाळ येथील महांकाली तर आटपाटीतील माणगंगा कारखान्यांनी गाळप सुरू केले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीत येत आहेत.

जिल्ह्यात जानेवारी अखेर पंधरा साखर कारखान्यांनी गाळप सरू केले. तासगाव येथील एस. जी. झेड कारखाना बंद होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या आता सोळा झाली आहे. हंगामाच्या मध्यावर कारखान्यांनी जास्तीत जास्त गाळपावर भर दिला आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने गाळपामध्ये आघाडी घेतली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षापासून दुष्काळी पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. परंतु कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली साखर कारखाना तर आटपाडीतील माणगंगा साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांचे यंदाचे गाळप हंगाम सुरू केले आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप आढावा

कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल)

श्री दत्त इंडिया ५.३९लाख ५.८४लाख

राजारामबापू पाटील, साखराळे ५.७० लाख ६.४१ लाख

विश्वासराव नाईक ४.२५ लाख ४.९५ लाख

हुतात्मा वाळवा ३.३९ लाख ४.०७ लाख

राजारामबापू पाटील (वाटेगाव) ३.६३ लाख ४.४२ लाख

राजारामबापू पाटील (जत) १.७२ लाख १.९१ लाख

सोनहिरा वांगी ६.५९ लाख ६.६३ लाख

क्रांती कुंडल ६.९२ लाख ६.७८ लाख

राजारामबापू पाटील (सर्वोदय) २.६४ लाख ३.१६ लाख

मोहनराव शिंदे २.०६ लाख २.१४ लाख

दालमिया (निनाईदेवी) ३.५६ लाख ४.२२ लाख

भारती शुगर (यशवंत शुगर) ८२ हजार ८५ हजार

केन ॲग्रो १.८० लाख १.६८ लाख

उदगिरी शुगर ४.१६ लाख ४.२० लाख

सद्‍गुरू श्री श्री ४.३६ लाख ३.६७ लाख

श्रीपती शुगर २.५० लाख २.७१ लाख

एस. जी. झेड (तासगाव) ८० हजार ५५ हजार

एकूण ६०.३४लाख ६४.२८ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT