Someshwar Sugar Factory : सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या ऊसतोडीला प्राधान्य द्यावे : काकडे

Satish Kakde : श्री सोमेश्वर कारखान्याने गेटकेन ऊसतोड बंद करून परिपत्रकानुसार सभासदांच्या ऊस तोडीला प्राधान्य देऊन, ती सुरू करावी, असे निवेदन शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिले.
Sanjay Kakde
Sanjay KakdeAgrowon
Published on
Updated on

Someshwar Nagar News : श्री सोमेश्वर कारखान्याने गेटकेन ऊसतोड बंद करून परिपत्रकानुसार सभासदांच्या ऊस तोडीला प्राधान्य देऊन, ती सुरू करावी, असे निवेदन शनिवारी (ता.३) शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना दिले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, की बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्याचा २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्याने ९२ दिवसांमध्ये ८ लाख ३६ हजार टन गाळप पूर्ण केले आहे.

Sanjay Kakde
Sugar Factory : कारखान्याच्या ‘एमडी’च्या वयाचा तिढा सुटला

त्यापैकी कारखान्याने १ लाख ९३ हजार टन एवढा गेटकेन ऊस गाळपास आणल्याचे समजले. त्यापैकी सभासदांच्या केवळ ६ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस तत्काळ बंद करून कारखान्याच्या परिपत्रकानुसार सभासदांच्या उसाची तोड व्हावी, असे म्हटले आहे.

Sanjay Kakde
Sugar Factory Committee : साखर कारखान्यांच्या थकहमीसाठी समिती

कारखान्याने गेटकेन ऊस अद्यापपर्यंत बंद केलेला नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आडसाली, सुरू व खोडवा असा एकूण ७ लाख २० हजार टन ऊस शिल्लक आहे.

सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप न झाल्याने सभासदांचे एकरी ८ ते १० टनाचे नुकसान झालेले आहे. कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी गेटकेन उसाची तोड बंद करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com