Onion Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Onion Seed : बोगस कांदा बियाणे विक्रीचे मध्य प्रदेश कनेक्शन

Onion Cultivation : उन्हाळ कांद्याला सध्या चांगला दर असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यातच पावसाने कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : उन्हाळ कांद्याला सध्या चांगला दर असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यातच पावसाने कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुबार रोपवाटिका तयार करण्यासाठी बियाण्यांची शोधाशोध सुरू आहे. अशातच काही बोगस विक्रेत्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमधून बोगस कांदा बियाण्यांची नाशिक जिल्ह्यात विक्री होत असून कृषी विभागाने त्याचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत सायखेडा तालुका निफाड येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे मध्य प्रदेशचे बोगस बियाणे विक्रीचे कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. शेतकऱ्यांकडून कांदा बियाण्यांची मागणी वाढली असताना काही विक्रेत्यांनी बनावट बियाणे विक्रीचा डाव साधला आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (ता. २१) छापा टाकून कारवाई केली.

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील राही नॅचरल सीड्स प्रा. लि. या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून तीर्थ एजन्सी (इंदूर) यांच्याकडून ‘फुरसुंगी प्लस’ या नावाने बनावट बियाणे पुड्यात भरून जिल्ह्यात विक्री होत असल्याची माहिती जिल्हा गुणनियंत्रण भरारी पथकास प्राप्त झाली होती.

त्यानुसार पथकाने राही नॅचरल सीड्स प्रा. लि.च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सायखेडा (ता. निफाड) येथील ‘ग्रो ॲग्रो सोल्यूशन’ या कृषी सेवा केंद्रावर छापा टाकला. या वेळी ३१,२०० रुपयांच्या बनावट कांदा बियाण्यांची पाकिटे भरारी पथकाला मिळाली.

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातून नाशिक जिल्ह्यात व परिसरात कांदा बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कारवाई कृषी विभागाने केली.

संबंधित विक्रेता रोहित घुगे व तीर्थ एजन्सी (इंदूर) यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८ व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये सायखेडा पोलिस स्टेशन येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांनी गुन्हा नोंदविला. कारवाईसाठी मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, राही नॅचरल सीड्सच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

‘बियाणे खरेदीत फसवणूक टाळावी’

नाशिक जिल्ह्यात पुरेसे कांदा बियाणे पाकिटे उपलब्ध झालेली असल्याने शेतकऱ्यांनी बनावट, बेकायदा व विनापरवाना कांदा बियाणे खरेदी करू नये. कांदा बियाणे तसेच इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच खरेदी करताना पक्क्या बिलाची मागणी करावी. याबाबत काही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT