Agri Expo 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expo 2025 : यंत्रे- अवजारे सांगतात यांत्रिकीकरणाची दिशा

Agriculture Technology : विविध प्रकारची यंत्रे व अवजारांमुळे कृषी यांत्रिकीकरणाच्या नव्या दिशा शेतकऱ्यांना सहजगत्या लक्षात येत आहेत. त्यासाठी निमित्त ठरते आहे ते ॲग्रोवन प्रदर्शन, अर्थात ‘ॲग्रो एक्स्पो २५’. येथे २२ हजारांच्या वखरापासून ते ९० लाखांच्या हार्वेस्टरपर्यंतची यंत्रे अवजारे पाहण्यास उपलब्ध आहेत.

Team Agrowon

Agriculture Mechanization : विविध प्रकारची यंत्रे व अवजारांमुळे कृषी यांत्रिकीकरणाच्या नव्या दिशा शेतकऱ्यांना सहजगत्या लक्षात येत आहेत. त्यासाठी निमित्त ठरते आहे ते ॲग्रोवन प्रदर्शन, अर्थात ‘ॲग्रो एक्स्पो २५’. येथे २२ हजारांच्या वखरापासून ते ९० लाखांच्या हार्वेस्टरपर्यंतची यंत्रे अवजारे पाहण्यास उपलब्ध आहेत.

बहुभूधारक किंवा अल्पभूधारक, सध्या सारेच शेतकरी त्रस्त आहेत ते मजूरटंचाईमुळे. या समस्येवर यांत्रिकीकरण हा पर्याय आहे. त्याबाबत अचूक मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनात मिळते आहे. येथे २० अश्‍वशक्तीचा साडेतीन लाखाचा छोटा ट्रॅक्टर, तर ६३ अश्‍वशक्तीचा तेरा लाखांचा मोठा ट्रॅक्टरदेखील मॅसे फर्ग्युसन कंपनीने सादर केला आहे.

विविध कंपन्यांची उत्पादने शेतकरी उत्सुकतेने पाहत आहेत. प्रात्यक्षिकासाठी (डेमो) नोंदणीही करीत आहेत. सिल्वर कंपनीने तयार केलेला व तासाला १८ ते २० टना ऊस तोडणारा अत्याधुनिक हार्वेस्टर येथे पाहण्यास मिळतो. प्रदर्शनास आलेले बेलापूर (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) गावचे प्रगतिशील शेतकरी दिलीप काळे म्हणाले, की आम्हाला यांत्रिकीकरणाची ओढ लागली आहे. त्यादृष्टीने यंत्रांची माहिती घेत आहे.

ड्रोन ते इलेक्ट्रिक बैल

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अवजारांच्या विविध दालनांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. बावीस हजारांचा छोटा हायड्रॉलिक वखर ते १७४ अश्‍वशक्तीचे भव्य ऊस तोडणी यंत्र या ठिकाणी पाहण्यास मिळते. ड्रोन, इलेक्ट्रिक बैल, स्वयंचलित टोकण यंत्र, मोठे नांगर, हार्वेस्टर, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, फवारणी यंत्रे, सौर यंत्रे, कडबाकुट्टी यंत्र तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीची दालने शेतकरी उत्सुकतेने पाहत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT