Painganga Project Work Agrowon
ॲग्रो विशेष

Painganga Project : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

Project Objection : विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांच्या सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांनी २७ वर्षांपासून विरोध केला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांच्या सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांनी २७ वर्षांपासून विरोध केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पस्थळी कामा संदर्भाने हालचाली सुरू झाल्याने या विरोधात शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले.

विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांच्या सीमेवर असलेल्या चिमटा (जिल्हा नांदेड) या गावात अरुणावती, अडान तसेच पैनगंगा या तीन नद्यांचा संगम होतो. याच संगमापासून काही अंतरावर १९९७ मध्ये १४०२ कोटी रुपयांची तरतूद करत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पाची सिंचन क्षमता एक लाख ६० हजार हेक्टर प्रस्तावित आहे.

त्यापैकी ८८ हजार हेक्टर उपसा सिंचन, २७ हजार आंध्र प्रदेश, ५८ हजार चंद्रपूर तर १३००० हेक्टर यवतमाळ जिल्ह्यासाठी याद्वारे सिंचन अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा फटका विदर्भ, मराठवाड्यातील ९५ गावांना बसणार आहे. त्यामध्ये आर्णी, घाटंजी, महागाव या यवतमाळ जिल्ह्यातील ५५, तर माहूर, किनवट तालुक्यांतील ४० गावांचा समावेश आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील पाच तालुक्यांत दीड लाखांवर लोकसंख्या विस्थापित होणार आहे. भरपाईचा मोबदलादेखील शासनाकडून कमी दिला जात आहे. वनक्षेत्रात हा प्रकल्प होणार असल्याने पर्यावरणाची देखील हानी होईल.

त्यासोबतच इतरही अनेक कारणांमुळे १९९७ पासून या प्रकल्पाला धरणविरोधी समितीने विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली येथील प्रचार सभेत हा प्रकल्प होणार नाही असे जाहीर सभेत सांगितले. मात्र त्यानंतर देखील कामाला सुरुवात करण्यात आली.
मुबारक तंवर, उपाध्यक्ष, निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT