Papaya Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Rate : खानदेशात पपई आवक अल्पदर १४ ते १८ रुपये प्रतिकिलो

Papaya Market : खानदेशात पपईदर स्थिर आहेत. यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी असून, शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीसंबंधी १४ ते १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईदर स्थिर आहेत. यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी असून, शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीसंबंधी १४ ते १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. आवक कमी असून, दर्जेदार पपईची पाठवणूक उत्तरेकडे होत आहे.

किमान दर १२ ते १३ रुपये प्रतिकिलोचा आहे. शेतकऱ्यांना जागेवर दर बऱ्यापैकी मिळत आहे. परंतु उत्पादन कमी किंवा हवे तसे नाही. यंदाच्या पावसासह त्यापूर्वीच्या अति उष्णतेमुळे हंगाम लांबला आहे. परिणामी, आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे.

पपईचा काढणी हंगाम खानदेशात ऑक्टोबर महिन्यात जोमात सुरू होतो. यंदा विषम वातावरण व इतर समस्यांमुळे उत्पादन कमी आहे. रोपांची उपलब्धता यंदा चांगली होती. यात अनेकांनी पपईची लागवड मे महिन्यात किंवा उशिरा केली आहे. यामुळे आवकही कमी आहे. दुसरीकडे खरेदीदारांकडून पपईस सध्या मागणी आहे.

सणासुदीचे दिवस आहेत. पपईचा उत्पादन खर्च यंदा वाढला आहे. जागेवर २५ रुपये प्रतिकिलोचा दर हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली जात आहे. मध्यंतरी शहादा (जि. नंदुरबार) येथील पपई उत्पादकांनी खरेदीदार, व्यापाऱ्यांशी दरांबाबत चर्चा केली. परंतु दरात फारशी किंवा वाढ झालेली नाही.

खानदेशातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी आहे. उठाव वाढला आहे. अशात खरेदीदारांकडून वाहने आणून कमी पक्व पपईची देखील खरेदी केली जात आहे. कारण पपईचा तुटवडा आहे. सध्या खानदेशात रोज १० ते १२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी

Assembly Elections Update: देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता!

Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

SCROLL FOR NEXT