Soybean Production agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Production : जळगावात उन्हाळ सोयाबीनचे कमी उत्पादन

Soybean Sowing : बाजारात रब्बी किंवा उन्हाळ हंगामासाठी सोयाबीन बियाणे फारसे नव्हते. काही कंपन्यांनी हे बियाणे पुरविण्याचे नियोजन केले. काही भागात आगाप उन्हाळ सोयाबीन पेरणी झाली.

Team Agrowon

Jalgaon Soybean : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली. पेरणी ३००० हेक्टरवर झाली. पण उत्पादन एकरी दोन ते अडीच क्विंटल एवढेच सरासरी आले आहे.

एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २००० हेक्टरपर्यंत झाली होती. शेतकरी बियाणे खर्च कमी करण्यासाठी घरातील प्रक्रिया केलेले बियाणे वापरत होते. काळ्या कसदार जमिनीत पेरणी अधिक झाली. बाजारात रब्बी किंवा उन्हाळ हंगामासाठी सोयाबीन बियाणे फारसे नव्हते. काही कंपन्यांनी हे बियाणे पुरविण्याचे नियोजन केले. काही भागात आगाप उन्हाळ सोयाबीन पेरणी झाली.

धुळे व नंदुरबारात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रिम जलसाठाधारक सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती देतात. थंडी लांबेल व सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी भीती काही शेतकऱ्यांना होती. परंतु प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी सोयाबीनचे चांगले उत्पादन उन्हाळ हंगामात घेत आहेत. नंदुरबार, धुळ्यातील पेरणी स्थिर होती.

जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी डिसेंबर महिन्यातच सुरू झाली. मागील महिन्यात मळणी पूर्ण झाली आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली. पाण्याची अडचण नसल्याने पेरणी वाढली. इतर पिकांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी तुषार, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनच्या सिंचनाचे नियोजन केले होते.

काळ्या कसदार जमिनीत पेरणी

सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत अधिकची झाली. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीन रावेर भागात कमी असतो. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात उन्हाळ सोयाबीन पीक होते. आपल्याकडील बियाण्याची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणीचे नियोजनही अनेकांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT