Onion Rate
Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांद्याला दर कमीच, पावसामुळे हानी

Team Agrowon

Jalgaon Onion News : खानदेशात कांद्याची पावसाने अतोनात हानी झाली आहे. यातच दर कमी असून, पीक आतबट्ट्याचे ठरले आहे. कांदा उत्पादकांची मोठी कोंडी यामुळे झाली आहे.

कांद्याला एकरी खर्च आला किमान २३ ते २४ हजार आणि उत्पादन येत आहे २० ते २५ हजार रुपये, अशी स्थिती आहे. कारण पिकात विषम वातावरण, बेमोसमी पाऊस, गारपीट व डेंगळांची समस्या यामुळे उत्पादन कमी येत आहे.

एकरी ६० क्विंटल उत्पादन काहींना येत आहे. काहींना एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळत आहे. खानदेशात यंदा सुमारे साडेसात हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. लागवड घटली. कारण खरिपातील व लेट खरिपातील कांद्याचे दर कमी होते. मे महिन्यात दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दर दबावातच आहेत.

सध्या प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये दर मिळत आहे. दरपातळी एक हजार रुपये यंदा अपवादानेच पोचली आहे किंवा अपवादानेच शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये दर मिळाला आहे.

उष्णतेत मजूरटंचाई वाढली आहे. कांदा काढणीचा खर्च एकरी पाच हजार रुपयांवर आहे. लागवडीसाठीदेखील एवढाच खर्च लागला.

खते, कीडनाशके, बियाणे यासाठी एकरी २३ ते २४ हजार रुपये खर्च आला. यात शेतकऱ्यांचा रोजचा मेहनताना गृहीत धरलेला नाही. वाहतूक खर्च व मेहनताला लक्षात घेतल्यास पिकात मोठा तोटा झाल्याचे दिसत आहे. सध्या काढणी वेगात सुरू आहे.

पावसामुळे काढणी आठ ते १० दिवस लांबली आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

बाजार समितीत ७०० क्विंटल आवक

खानदेशातील बाजारांत कांद्याची आवक यंदाही अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता.यावल), चाळीसगाव, धुळ्यात साक्री, पिंपळनेर (ता. साक्री), धुळे या बाजार समित्यांत व उपबाजारांत कांद्याची आवक रोज वाढत आहे.

जळगाव बाजार समितीत रोज ७०० क्विंटल कांद्याची आवक सध्या होत आहे. शनिवारी आवक अधिक असते. पावसाने कांद्याचा दर्जा खालावला आहे. यामुळे दर कमी मिळत असून, अनेकांचा वाहतूक खर्चही निघत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT