Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ३ हजार ६२७ हेक्टरचे नुकसान

Post Monsoon Rain : मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये यंदा सुरुवातीला जून वगळता चांगला पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तीन दिवसांत मॉन्सूनोत्तर, पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे तीन हजार ७९१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. यामुळे तीन हजार ६२७ हेक्टरवरील कापूस, तूर, ज्वारी, हरभरा व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नायगाव, अर्धापूर, मुखेड व भोकरमध्ये सर्वाधिक पीक नुकसान असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून अंतिम अहवाल शासनाकडे पाठविला आहे.

मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये यंदा सुरुवातीला जून वगळता चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा २७, २८ व २९ नोव्हेंबर दरम्यान, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट, पाऊस झाला.

तीन दिवसात एकूण १५ मंडळात अतिवृष्टी झाली. अर्धापूरमध्ये केळी, पपईच्या बागा आडव्या झाल्या आहेत. या पावसामुळे तुरीच्या फुलाची गळ झाली. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजल्यामुळे कापसाच्या वाती झाल्या.

बरेच दिवस शेतात पाणी साचून राहिले होते. तसेच वीज पडून पाच जनावरे दगावली. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यंत्रणेला दिले होते.

नुकसान स्थिती...

५ कोटी २५ लाख निधीची मागणी मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीने एक हजार ६१०.३० हेक्टरवर जिरायती, एक हजार १८४.५० हेक्टरवर बागायत, तर ८३२.७० हेक्टरवर फळपिकांचे असे एकूण तीन हजार ६ हजार २७.५० हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने अपेक्षीत पाच कोटी २५ लाख ५९ हजार ८०० रुपये इतक्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT