Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बनावट पावती पुस्तकाद्वारे लाखो रुपयांची लुट

APMC Market : विविध गैरव्यवहार, अंदाधुंद व्यवहार, शेतकरी समस्यांकडे दुर्लक्ष्य असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे शेतकरी, अडते, ग्राहक आणि वाहनचालकांची सर्रास लुट सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : विविध गैरव्यवहार, अंदाधुंद व्यवहार, शेतकरी समस्यांकडे दुर्लक्ष्य असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे शेतकरी, अडते, ग्राहक आणि वाहनचालकांची सर्रास लुट सुरू आहे.

या प्रकारास बाजार समितीच्या संचालक मंडळाचा ‘आशीर्वाद’ असल्याची चर्चा असून, आत्तापर्यंत लाखो रुपयांची लुट झाल्याचे समोर येत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य असल्याची देखील चर्चा बाजार आवारात आहे.

बाजार समितीमध्ये संचालकांची नियुक्ती झाल्यापासून विविध अंदाधुंद कामकाजाचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये अतिक्रमणे, अनधिकृत टपऱ्या, पार्किंग शुल्क वसुली, ठेकेदारी, अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत लिंबांचा व्यापार, आदी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यात आता बनावट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीच्या ठेकेदारांकडून ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या गाड्यांना बनावट पावत्या देऊन ‘नो पार्किंग’ शुल्क वसुल केले जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सुरक्षा व अतिक्रमण विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

भुसार विभागातील फळे भाजीपाला विभागाच्या गेट नंबर-४ च्या परिसरात ठेकेदाराला ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त रहदारीच्या अर्ध्या रस्त्यावर ताबा मारत पार्किंग शुल्क वसुलीसह, पहाटे ठेकेदाराचे कर्मचारी वाहनांमध्ये झोपलेल्या चालकांना उठवून दमदाटी करत पैसे वसूल करीत असल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला आहे.

...असा आहे गैरप्रकार

बनावट पावती क्रमांक-४८३९ या पावतीवर २८ मे रोजी संतोष रेणुसे यांच्याकडून (एमएच-१२ क्यूआर ९३१६) या वाहनासाठी ‘नो पार्किंग’च्या नावाखाली ३२० रुपये शुल्क वसुल केले. तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या मूळ पावती क्रमांकाव्दारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.

बाजार समितीची हुबेहुब पावती तयार करून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. पैसे वसूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. आर. एस. धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT