Prajwal Revanna  Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Result 2024: कर्नाटकच्या एका जागेचा आला निकाल; हसनमधील 'जेडीएस'चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसनं पहिला विजय मिळवला. हसन मतदार संघातून श्रेयस पटेल यांनी जेडी(एस) चे विद्यमान खासदार प्रज्वल रेवन्ना यांमचा ४४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

Dhananjay Sanap

कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसनं पहिला विजय मिळवला. हसन मतदार संघातून श्रेयस पटेल यांनी जेडी(एस) चे विद्यमान खासदार प्रज्वल रेवन्ना यांमचा ४४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. प्रज्वल रेवन्ना जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांना निकालाच्या काही दिवस आधीच अटक करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये २८ जागांपैकी १८ जागांवर भाजप-जेडीएसची युतीची आघाडी आहे. तर कॉँग्रेसने १० जागांवर आघाडी मिळवली आहे.

प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. यावरून कॉँग्रेसनं जोरदार प्रचार करत युतीसमोर आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळं या जागेकडे विशेष लक्ष होतं. प्रज्वल रेवन्ना

कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजपची कॉँग्रेसनं धूळधाण उडवली होती. त्यामुळे दक्षिण राज्यातील भाजपच्या विस्ताराच्या मनसुब्याला वेसण घातलं गेलं. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत भाजपनं जेडीएसला सोबत घेत कर्नाटकवर विशेष लक्ष केंद्रित केलं.

एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये भाजपला २३ जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं. कारण जेडीएसचा भाजपला फायदा होईल, असं बोललं जात होतं. जेडीएसने २५ वर्षात पहिल्यांदाच हसनची जागा गमावली आहे. रेवन्ना २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा करत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

SCROLL FOR NEXT