Prime Minister Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister Narendra Modi :'आम्ही पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनतीने काम करू' : मोदी यांचे आश्वासन

Parliament Session 2024 : १८व्या लोकसभेचे पहिले संसदेचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले. याच्याआधी मोदींनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : १८व्या लोकसभेचे पहिले संसदेचे अधिवेशन (Lok Sabha Session 2024) सोमवारी (ता. २४) सुरू झाले. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११ वाजता लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यादरम्यान मोदी यांच्या मंत्रिमंडळासह २८० नवीन खासदार शपथ घेतील. यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरि महताब यांची लोकसभा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. याआधी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, आजचा दिवस गौरवशाली असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसदेत शपथविधी सोहळा होत आहे. त्यामुळे आम्ही देशातील जनतेला सांगतो की आम्ही आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट मेहनतीने काम करू, आजच्या महत्त्वाच्या दिवशी, मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

संसदेची स्थापना भारताच्या सामान्य माणसाच्या पूर्ततेसाठी असून नवा उत्साह, नवी गती आणि नवीन उंची गाठण्याची ही उत्तम संधी आहे. आमचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर १८ वी लोकसभेला सुरुवात होत असून ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि गौरवशाली पद्धतीने पार पडली. ६५ कोटींहून अधिक मतदारांनी मतदानात भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. ही संधी ६० वर्षांनंतर मिळाली. ही एक अतिशय अभिमानास्पद घटना असल्याचेही मोदी म्हणाले.

तसेच मोदी म्हणाले की, आम्हाला तिसऱ्यांदा जनतेनं संधी दिली याचा अर्थ आमचा हेतू जनतेला मान्य आहे. जनतेला आमची धोरणं मान्य आहेत. जनतेनं आमच्या लोकांप्रती असलेल्या समर्पणाला मान्यता दिली. गेल्या १० वर्षात आम्ही देशाला पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. मला विश्वास आहे की सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे आणि देश चालवण्यासाठी सहमती आवश्यक असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही १४० कोटी देशवासीयांच्या आशा पूर्ण करू. सर्वांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. आम्हाला संविधानाचे पालन करत निर्णयांना गती द्यायची आहे. १८व्या लोकसभेत तरुण खासदारांची संख्या चांगली आहे.

मोदी म्हणाले की, आज २४ जूनला आपण पुन्हा भेटत आहोत. उद्या २५ जून असून हा दिवस या देशाच्या संविधानाच्या प्रतिष्ठेला समर्पित असणारा आहे. देशाच्या परंपरांवर निष्ठा ठेवणाऱ्यांसाठी अविस्मरणीय हा दिवस आहे. याच दिवसाच्या निमित्ताने आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही अभिमानाने संविधानाचे रक्षण करू आणि भारताच्या लोकशाहीचे आणि पारंपरिक परंपरांचे रक्षण करू. आम्ही भारतीय राज्यघटनेच्या सूचनेनुसार ज्वलंत लोकशाही आणि सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करू.

देशातील जनतेनं आम्हाला तिसऱ्यांदा सरकार चालवण्याचे आदेश दिले. आम्ही तिसऱ्या टर्ममध्ये पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनतीने काम करू. या संकल्पानांनी आम्ही पुढे जाऊ. सर्व खासदारांकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या पावलांची अपेक्षा असून आतापर्यंत निराशाच झाली. मात्र यंदा लोकशाहीचा सन्मान राखत विरोधक योग्य भूमिका घेत देशातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा अशी आशा करतो, असेही मोदी म्हणाले.

देशातील लोकांना फक्त घोषणा नको आहेत. त्यांना काम हवं आहे. तसेच देशाला चांगल्या विरोधी पक्षाची अपेक्षा लोकांना असून १८ व्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेले खासदार सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर खरे उतरतील. आपण सर्व मिळून देशाच्या जनतेने दिलेली नवी जबाबदारी पार पाडूया असेही मोदी म्हणाले.

१८व्या लोकसभेत एनडीएकडे २९३ जागांसह बहुमत आहे तर भाजपकडे २४० जागा आहेत. विरोधी पक्ष इंडिया आघाडीकडे २३४ जागा असून काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT