Loan Update Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Update : अर्थव्यवस्थेत कर्जाचा भस्मासूर

Corporates loans : डोक्यावरचे कर्ज वाजवी आहे की नाही, ते कर्जदाराच्या उत्पन्नावर मोजले जाते. डोक्यावरचे कर्ज उत्पन्नापेक्षा अवाजवी झाले, तर कर्जदार आज ना उद्या हात वर करणार, कर्जे / व्याज थकवणार.

संजीव चांदोरकर

Indian Agriculture : एखाद्या भूभागात प्रचंड भूकंप झाल्यानंतर तिथल्या धरणाला आतून कोठेतरी तडा जातो; पण तो दिसत मात्र नाही. धरण वरकरणी पूर्वीसारखे दिसत असले तरी तज्ज्ञांना कळते, की ‘स्ट्रक्चरल डॅमेज’ झाले आहे.

त्यामुळे आज नाही उद्या काहीतरी गडबड होऊ शकते. कोरोनाकाळाने लादलेले आर्थिक संकट हे त्या भूकंपासारखे होते. या संकटावर वरकरणी वाटणारी मात कशी केली आहे? एका शब्दात उत्तर आहे - कर्जे काढून.

जगातील लष्करी ताणतणाव वाढत असल्यामुळे देश संरक्षण सामग्रीवर खर्च करण्यासाठी कर्जे काढत आहेत, कॉर्पोरेट्स आधीची कर्जे फेडण्यासाठी आणि ८० टक्के नागरिक जगण्यासाठी. कोरोना साथ येण्यापूर्वी जगभरातील सर्व प्रकारच्या कर्जदारांनी काढलेली कर्जे २६० ट्रिलियन डॉलर्स होती. मार्च २०२३ अखेरीस कर्जाचा आकडा ३०५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे.

डोक्यावरचे कर्ज वाजवी आहे की नाही, ते कर्जदाराच्या उत्पन्नावर मोजले जाते. डोक्यावरचे कर्ज उत्पन्नापेक्षा अवाजवी झाले, तर कर्जदार आज ना उद्या हात वर करणार, कर्जे / व्याज थकवणार. जगातील एकूण कर्जाचे जागतिक जीडीपीशी गुणोत्तर चक्क ३३५ टक्के झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत

- जागतिक अर्थव्यवस्थेवरील पुढचे अरिष्ट कर्जबाजार कोसळल्यामुळे ट्रिगर होईल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

- जगातील विमा/ पेन्शन कंपन्यांनी कॉर्पोरेट्सना दिलेली कर्जे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. ही कर्जे काही प्रमाणात थकवली गेली तरी त्याचा परिणाम सामाजिक सुरक्षेवर होऊ शकतो.

- ३०५ ट्रिलियन डॉलर्स कर्जावर सरासरी ५ टक्के व्याजदर धरला तरी दरवर्षी १५ ट्रिलियन डॉलर्स फक्त व्याजापोटी भांडवलाकडे वर्ग होत असतात. भांडवल सरप्लस काढून घेण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्या जातात. १५ ट्रिलयन डॉलर्स म्हणजे भारताच्या जीडीपीच्या चौपट.

- जगात आपल्या रिझर्व्ह बँकेसारख्या केंद्रीय बँका कर्ज बाजारावर नजर ठेवून असतात; पण गेल्या काही वर्षांत शॅडो बँकिंग संस्था (म्हणजे व्हेंचर / प्रायव्हेट कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, सॉव्हरिन वेल्थ फंड इ.) मोठ्या प्रमाणावर कर्जे देऊ लागल्या आहेत. त्यांच्यावर केंद्रीय बँकांचे नियंत्रण नाही.

- अमेरिका, स्वीडनमधील बँकिंग अरिष्ट त्या देशांतील सरकारांनी वेगवान हालचाली करून, सार्वजनिक पैसे वापरून पसरू दिले नाही हे खरे. पण हे म्हणजे धरणांच्या भेगांमध्ये व्हाइट सिमेंट भरण्यासारखे आहे.

भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगायची स्पर्धा लागली आहे सत्ताधारी वर्गात. पण याआधीच्या कोणत्याही जागतिक अरिष्टापेक्षा २०२०च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी अनेक पटीने एकजीव झालेली दिसतेय. त्यामुळे जागतिक संकटाचा आपल्यावरदेखील परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT