Life  Agrowon
ॲग्रो विशेष

वर्तमानात जगा!

एकदा एक भिक्खू त्याच्या अनुयायांसह प्रवास करीत असताना एके ठिकाणी एक छोटासा ओढा एका स्त्रीला ओलांडता येत नसल्याने ती तिथेच कुणाच्या तरी मदतीची वाट पाहत होती.

Team Agrowon

संजय गोरडे

एकदा एक भिक्खू त्याच्या अनुयायांसह प्रवास करीत असताना एके ठिकाणी एक छोटासा ओढा एका स्त्रीला ओलांडता येत नसल्याने ती तिथेच कुणाच्या तरी मदतीची वाट पाहत होती. साधूने त्या स्त्रीची अडचण लक्षात घेत तिचा हात हातात घेऊन तिला ओढा ओलांडण्यास मदत केली. ती वाहून जाऊ नये म्हणून त्यांना एकदा तिच्या कमरेपाशी हात घालून तिला पकडूनही ठेवावे लागले. नदी ओलांडल्यानंतर स्त्रीने साधूचे आभार मानले.

पुढे खूप अंतर चालून गेल्यावर त्यांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, की आचार्य, तुम्ही तर संन्यासी आहात. तुम्हाला स्त्री स्पर्शच वर्ज्य आहे. इतकेच काय तर स्त्रीकडे बघणेसुद्धा निषिद्ध आहे. तर मग तुम्ही त्या स्त्रीला कसा काय आधार दिला? साधूचे उत्तर खूप सुंदर होते. ते म्हणाले, की मी तर त्या स्त्रीला काठावरच सोडून आलो. तू मात्र तुझ्या मनात तिच्या विषयाचे ओझे अजून वागवत आहेस.

नदी ओलांडताना आपण नावेतून गेलो, तर ती नाव तिथेच तीरावर सोडून पुढे जातो. किंवा एखाद्या उथळ जागेवरून प्रवाह ओलांडताना आपल्या सोयीसाठी आपण काही दगड पाण्यात टाकतो त्यावर पाय देऊन पुढे निघून जातो; पण ते दगड आपण पुन्हा सोबत उचलून नेत नाही. मात्र हेच साधेसोपे व्यावहारिक शहाणपण जीवन जगताना आपण वापरायचे विसरतो. माझ्या एका कवितेत मी लिहिलेय, की

‘माजघरामध्ये जी अंधारात हरवलेली आहे

अंगणातल्या उजेडात ती वस्तू शोधत आहे मी’

अशी अनेकांची अवस्था असते. भूतकाळातील कुठल्याशा कटू गोड आठवणी वेताळासारख्या पिच्छा पुरवतात, पाठ सोडत नाहीत. त्यातून माणसाला त्याच त्या जखमा भळभळत ठेवण्याची व तेच जुने दुःख उगाळून रडत बसण्याची सवय जडते.

मान्य, की एखादी खूप वाईट घटना तुमच्यासोबत घडलेली असेल. त्याचं दुःख खूप मोठं असेल, पण आयुष्य खूप छोटं आहे आणि तितकंच अनमोलदेखील. त्यामुळे ते असं निरर्थकपणे वाया घालवण्यासाठी नाहीये. जे हिरवलं गेलं किंवा नाही मिळू शकलं, त्यासाठी आयुष्यभर आदळआपट करण्यात काही हशील नाही. वस्तुस्थिती समजून घेऊन सद्यपरिस्थितीत ज्या संभावना आहेत, त्यातील आनंदाला आपण का पारखे होतो?

प्रत्येकालाच सचिन, आमिताभ किंवा एम. एफ. हुसैन व्हायचे असते. फार थोड्या लोकांना हे कळतं, की आपण आपल्या कथेचे नायक आहोत. ते स्वतःसारखे होतात. त्यांची ओळख बनते. आपल्याला आपल्यासारखे व्हायची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT