Fertilizer Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

Fertilizer Linking : खतांची मागणी यंदा बऱ्यापैकी आहे. कारण पाऊसमान चांगले राहिल्याने रब्बीत पेरण्याही वेळेत सुरू झाल्या आहेत. पेरण्यांना सुरुवातीपासून गती असल्याने खतांची मागणीही आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात मागील हंगामापेक्षा यंदा अधिकची खतटंचाई आहे. बियाणे बाजारात जशी आर्थिक पिळवणूक झाली, तशीच लूट खतबाजारात सुरू असून, युरिया, डीएपी, १०.२६.२६ ची जादा दरात विक्री सुरू आहे.

खतांची मागणी यंदा बऱ्यापैकी आहे. कारण पाऊसमान चांगले राहिल्याने रब्बीत पेरण्याही वेळेत सुरू झाल्या आहेत. पेरण्यांना सुरुवातीपासून गती असल्याने खतांची मागणीही आहे.

खतांचा पुरवठा मात्र यंदा हवा तसा नाही. खतांचे पुरवठा लक्ष्यांक जसा मंजूर झाला, तसा मात्र पुरवठा नसल्याने मागील महिन्यात व या महिन्यातही खतटंचाई आहे. युरिया, १०.२६.२६ ही खते दुरापास्त झाली आहेत.

युरिया, १०.२६.२६ या खतांवर लिकिंग सर्रास सुरू आहे. लिकिंग करणे गुन्हा नाही, असा दम जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागातील खत विक्रेते शेतकऱ्यांना भरत आहेत.

युरिया, १०.२६.२६ तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये व अन्य खते घेण्याची सक्ती केली जात आहे. याशिवाय ही खतेच शेतकऱ्यांना दिली जात नाहीत. जिल्ह्यात खतांचा मोठा काळाबाजार, प्रशासनाकडून चालढकल, मनमानी असा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT