Deer Rescue  Agrowon
ॲग्रो विशेष

Deer Rescue : शेततळ्यात पडलेल्या हरणाचे वाचविले प्राण

Team Agrowon

Nashik News : चिचोंडी बुद्रूक (ता. येवला) येथे बेदनाला भागातील गोसावी वस्तीवर कुत्रे मागे लागल्याने हरिण शंकर गोसावी यांच्या शेततळ्यात पडले. ही घटना जवळच असलेल्या शंकर गोसावी यांनी पाहिली.

शेततळ्यात पाणी असल्याने व प्लॅस्टिक कागदामुळे हरणाला वर येता येत नव्हते. हे लक्षात येताच परिसरातील तरुणांना बोलावून या हरणाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आले.

शेततळ्यात पडलेले अंदाजे दोन वर्ष वयाचे मादी जातीचे हरिण येथील कार्तिक गोसावी, गोरख पगारे, गणेश गोसावी, औदुंबर मढवई, शंकर गोसावी, विजय सोनवणे, बाळा गायकवाड, लखन मोरे यांनी शेततळ्यात उतरून दोरीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.

त्याला कुठल्याही प्रकारची जखम नसल्याचे लक्षात आल्यावर त्यास बेदनाला चराई क्षेत्रात सोडून दिले.

मादी जातीच्या या हरणाने मोकळे होताच धूम ठोकली. चिचोंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणांचे कळप दिसून येत असून पाण्याच्या शोधात हरणांचे कळप बेदनाला भागात नेहमी वावरताना दिसतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT