Agriculture center Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shop : हिंगोली जिल्ह्यात पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Kharif Season : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांचे बियाणे, विविध ग्रेडची रासायनिक खते यांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे.

Team Agrowon

Hingoli News : खरीप हंगामात कपाशीच्या बियाणे पाकिटांची विक्री कमाल किरकोळ किंमत (एमआरपी)पेक्षा जास्त दराने केल्याप्रकरणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी हिंगोली जिल्ह्यातील ५ कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने निलंबित केले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांचे बियाणे, विविध ग्रेडची रासायनिक खते यांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. विशेषत: कापूस पिकाबाबतीत शेतकऱ्यांचा कल बीटी कपाशींच्या विविध वाणांकडे आहे.

शासनाने तुलसी कंपनीचे बीटी कापूस वाण, कबड्डी, पंगा, राशी कंपनीचे राशी ६५९ तसेच इतर सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बीजी-२ कापूस बियाण्याच्या पाकिटाची कमाल किरकोळ विक्री किंमत ८५३ रुपये एवढी ठरवलेली आहे.

तथापि, काही कृषी सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांना एमआरपीपेक्षा जास्त दर सांगत असल्याची घटना निदर्शनास आले आहे. कृषी विभागाने तत्काळ त्याची दखल घेऊन कृषी सेवा केंद्राची तपासणी केली.

या दरम्यान त्रुटी आढळून आल्यामुळे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी हिंगोली येथील मंगलमूर्ती कृषी केंद्र, गजानन कृषी केंद्र, स्वामी सुखदेवानंद कृषी सेवा केंद्र हे ३ तसेच शिरडशहापूर येथील अनुसया ट्रेडर्स, किसन ॲग्रो सर्व्हिसेस ॲन्ड इरिगेशन या २ असे एकूण ५ कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने निलंबित केले आहेत.

शेतकऱ्यांनी कपाशीचे बियाणे, इतर निविष्ठा (खते, कीटकनाशके आदी) एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी करू नये.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निविष्ठांच्या गुणवत्ता, उपलब्धतेबाबत काही अडचण, तक्रार असल्यास तत्काळ कृषी विभागाच्या तक्रार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT