Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. २८८ मतदारसंघाच्या पहिल्या कलानुसार महायुतीनं आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी मतमोजणीची पहिली तर काही ठिकाणी तिसरी ते चौथी फेरी सुरू आहे.
Maharashtra Vidhansabha Election 2024
Maharashtra Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Vidhansabha Election Result Live Update : विधानसभा निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. २८८ मतदारसंघाच्या पहिल्या कलानुसार महायुतीनं आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी मतमोजणीची पहिली तर काही ठिकाणी तिसरी ते चौथी फेरी सुरू आहे. मग राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, महसूल तथा पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लढतीचं चित्र काय ते समजून घेऊ. हे अंतिम निकाल नाहीत तर केवळ आघाडी आणि पिछाडीचे चित्र आहे.

परळी मतदारसंघ

सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत परळीतून धनंजय मुंडे यांनी ३ हजार ४२८ मतांनी आघाडी घेतली आहे. धणजी मुंडे यांच्या विरोढधात राजेसाहेब देशमुख हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. देशमुख यांना पहिल्या फेरीत २ हजार ७७१ तर मुंडे यांना ६ हजार १९९ मत पडली आहेत. सध्या परळीतून मुंडे आघाडीवर आहेत.

शिर्डी मतदारसंघ

शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडी घेतली आहे. विखे पाटील यांना ६ हजार ३३२ मतांची आघाडी आहे. विखे यांच्या विरोधात कॉँग्रेसच्या प्रभावती घोगरे मैदानात आहेत. विखे यांना तिसऱ्या फेरीपर्यंत १९ हजार २१८ तर घोगरे १२ हजार ८८६ मत मिळाली आहेत.

Maharashtra Vidhansabha Election 2024
Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

सिलोड मतदारसंघ

सिलोड मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार पहिल्या फेरीत ८८९ मतांनी पिछाडीवर आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी ४ हजार २६३ मत घेतली आहेत. तर अब्दुल सत्तार यांना ३ हजार ३७४ मतं मिळाली आहेत.

आंबेगाव मतदारसंघ

आंबेगाव मतदारसंघात दुसऱ्या फेरीत दिलीप वळसे पाटील यांनी २४५ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम मैदानात आहेत. निकम यांना ७ हजार २०९ तर वळसे पाटील यांना ७ हजार ४५४ मत पडली.

जामनेर मतदारसंघ

जामनेर मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश महाजन यांनी चौथ्या फेरीपर्यंत ४ हजार ११८ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप खोपडे निवडणूक लढवत आहेत. महाजन यांना चौथ्या फेरीपर्यंत २० हजार ६८४ तर खोपडे यांना १६ हजार ५६६ मत मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com