Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : विनापरवाना विक्रीप्रकरणी बियाणे कंपनीचा परवाना रद्द

Seed Sale : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील मे. गोदावरी सीड्‌स अँड बायोटेक कंपनीच्या नावाने विनापरवाना बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात १२ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Team Agrowon

Nanded News : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील मे. गोदावरी सीड्‌स अँड बायोटेक कंपनीच्या नावाने विनापरवाना बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात १२ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय परवाना रद्द करण्यात आला. यानंतर राज्यस्तरीय परवानाही कृषी संचालकांनी (निवगुनि) रद्द केला.

कोलंबी येथील पंडित कच्छवे यांनी मे. गोदावरी सीड्‌स अँड बायोटेक कंपनीकडून सोयाबीन बियाणे विनापरवाना विक्री करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीवरून नायगाव तालुका कृषी अधिकारी, नायगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी व जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षकांनी बियाणांचा साठा जप्त करून विनापरवाना सोयाबीन बियाणे पॅकिंग व वाहतूक प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात १२ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता.

यात ४५२.४० क्विंटल सोयाबीन बियाण्यांसह ९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कृषी विभागाकडून बियाणे कायद्यानुसार घेतलेल्या सुनावणी दरम्यान समाधानकारक खुलासा केला नसल्यामुळे जिल्हा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्हास्तरीय बियाणे विक्री परवाना डिसेंबर २०२३ मध्ये कायमस्वरूपी रद्द केला. या कंपनीस कृषी आयुक्तालयाकडून २६ सप्टेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत बियाणे विक्रीबाबत राज्यस्तरीय परवाना दिला होता. पंरतु या कंपनीने परवान्याचे नूतनीकरण न करता बियाणे विक्री करण्याचे काम सुरू ठेवले.

दरम्यान, विनापरवाना बियाणे विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचे संचालक पंडित कच्छवे यांनी राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी संचालक (निवगुनि) कार्यालयाकडे राज्यस्तरीय बियाणे विक्री परवाना मुदतवाढीसाठी अर्ज केला.

यात विशेष म्हणजे जिल्हास्तरावर परवाना रद्दची झालेली कार्यवाही अवगत असताना कृषी आयुक्तालयाकडून या कंपनीला २३ मे २०२४ ते २२ मे २०२९ पर्यंत परवाना बहाल करण्यात आला. यानंतर कंपनीचे संचालक पंडित कच्छवे यांना कृषी आयुक्तालयात सुनावणीस बोलावून खुलासा मागविण्यात आला. खुलासा समाधानकारक नसल्याचे निर्दशनास आल्यामुळे कृषी संचालक (निवगुनि) विकास पाटील यांनी कंपनीचा राज्यस्तरीय परवाना सोमवारी (ता. १२) कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT