Collector Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming : डाळिंबाला पुन्हा वैभव मिळवून देऊ

Pomegranate Issue : मागील काही वर्षापासून डाळिंबावर पडणारे विविध रोग व त्यातून कमी दर्जाचे पीक आल्याने भाव न मिळल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Solapur News : डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूरची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षापासून डाळिंबावर पडणारे विविध रोग व त्यातून कमी दर्जाचे पीक आल्याने भाव न मिळल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी व शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन जिल्ह्याला डाळिंब पिकात गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला भेट देऊन डाळिंब पिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली.

यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री. मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते. पाकणी येथील डाळिंब पिकविणारे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळिंब पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली.

यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी डाळिंब पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून क्षेत्र वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. तसेच क्षेत्रवाढीसाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार व भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT