Lemon Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Rate : सोलापूरच्या बाजारात लिंबाचे दर घसरले

Lemon Market Update : उत्तर भारतातातील राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील महानगरांमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : उत्तर भारतातातील राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील महानगरांमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून लिंबू बागांना पाण्याची कमतरता भासत आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी भीतीने अपरिपक्व लिंबू बाजारात विक्रीसाठी दाखल करत आहेत. याचाही दरावर फार मोठा परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात १५० रुपये प्रतिकिलो असणारा लिंबाचा दर ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला आहे.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना या राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे या भागात असणारी लिंबाची मागणी घसरली आहे. या राज्यात मागणी घसरल्यामुळे येथील बाजारपेठेत जाणारा लिंबू स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. साहजिकच याचा दरावर परिणाम झाला असून लिंबाचे दर कमालीचे घसरले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तापमानाने ४४ अंशाचा पारा ओलांडला. पाणी कमी पडल्यामुळे लिंबाचा दर्जा घसरला आहे. येणाऱ्या काळात आणखीन दर्जा घसरण्याच्या भीतीने शेतकरी अपरिपक्व लिंबाची काढणी करत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

उत्तर भारतात अवकाळी पाऊस पडत आहे. तेथील महानगरांतील लिंबाची मागणी घटली आहे. याचबरोबर शेतकरी पाणी कमी पडण्याच्या भीतीने लहान अपरिपक्व लिंबू विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे.
- अल्ताफ लिंबूवाले, अडते, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT