Ambadas Danve Suspension Agrowon
ॲग्रो विशेष

Ambadas Danve Suspension : अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली; दानवेंवर निलंबनाची कारवाई

Monsoon Session 2024 : पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांना भोवली आहे. याप्रकरणी दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदुत्वाविषयीच्या वक्तव्यावरून राज्याचे पावसाळी अधिवेशनात सोमवारी (ता.१) पडसाद उमटले. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे थेट भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावरून सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी (ता.२) अधिवेशनात दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली. त्या मागणीनुसार अंबादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून पाचव्या दिवशी थेट विधानपरिषद विरोधी पक्ष नेत्यावरच निलंबनाची कारवाई झाली. विधीमंडळात राहुल गांधी यांच्या भाषणावरून जोरदार गोंधळ उडाला. त्यावरून दानवे यांनी भूमिका मांडली. तसेच त्यांनी आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यानंतर भाजप आमदारांसह भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी निलंबनाचा ठराव मांडला. तर अशा ठरावावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारच्या ठरावावर चर्चा होत नाही. असा आग्रह होतो तोच चुकीचा असल्याचे फडणवीस म्हणाले.

सभापती नीलम गोऱ्हे

यावरूनच नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना, आमची आज गटनेत्यांसोबतही चर्चा झाली होती. खरंतर गटनेत्यांसोबत झालेली चर्चा इथे मांडली नसती. पण कुणाला संधी दिली नाही, असा विचार लोकांमध्ये जाऊ नये म्हणून सांगावं लागत आहे. मात्र त्यासंदर्भात कुठलाही पुनर्विचार किंवा वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसत नाही. तर गट नेत्याशी चर्चेवेळी ते उपस्थित नव्हते.

सोमवारी देखील तो प्रकास झाला तो योग्य नव्हता. सभागृहात अर्वाच्य भाषेत सर्वच बोलायला लागले तर सभागृहातील महिलांना काम करणं अवघड जाईल. तर आपण असेच करू असे म्हणणे देखील योग्य नाही. तर सभागृहात येताना सदस्यांनी महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण तयार केलं पाहिजे. त्यामुळे अत्यंत दु:खद अंतकरणाने हा निर्णय घेत असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तर पाच दिवसांचं निलंबन करताना दानवे यांना अंतिम आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता यावं म्हणून हा मध्यममार्ग काढण्यात आल्याचं गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अशा पद्धतीने निलंबन झाल्यानंतर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने निलंबन केल्याने काही फरक पडत नाही. त्यांना जे काही करायचे ते करु द्या. भाजपने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. तर संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायद्यांबाबत मला किंवा उद्धव ठाकरेंना शिकवण्याची गरज नाही. राजीनाम्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी सभापतींकडे करावी. तर मी शिवसैनिक असून जशाच तसे उत्तर दिले. त्यांच्यासारखा पळपुटा नाही. जे बोललो ते बोललो. मला मान्य असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT