Udgir APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Udgir APMC : शेतमाल विक्रीतून ‘कडते’ घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

Agriculture Market Update " मागील काही दिवसापासून उदगीर मार्केट यार्डातील शेतकऱ्यांचे विक्रीसाठी माल घेऊन आलेल्या मालांमधून येथील आडत व्यापारी हमालांना मातरे, खरेदीदार व्यापाऱ्यांना दोन चाळण्या करून कडते व जास्तीची हमाली देत होते.

Team Agrowon

Latur News : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मालातून हमालांना मातरे व खरेदी दारास कडते दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी बाजार समितीला दिल्या आहेत.

मंगळवारी (ता. १८) त्यांनी उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, व्यापारी, दाल मिल असोसिएशन, हमाल संघटनानेच प्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या संयुक्त बैठकीत उपस्थित राहून सक्त ताकीद दिली.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, सहाय्यक निबंधक बाळासाहेब नांदापूरकर, सभापती प्रीती भोसले, संचालक कल्याण पाटील, विजय निटूरे, मधुकर एकुर्केकर, प्रमोद पाटील, संतोष बिरादार, गौतम पिंपरे, वसंत पाटील, जगदीश बाहेती, रवींद्र कोरे, प्रदीप पाटील उपस्थित होते.

मागील काही दिवसापासून उदगीर मार्केट यार्डातील शेतकऱ्यांचे विक्रीसाठी माल घेऊन आलेल्या मालांमधून येथील आडत व्यापारी हमालांना मातरे, खरेदीदार व्यापाऱ्यांना दोन चाळण्या करून कडते व जास्तीची हमाली देत होते.

अशा आशयाच्या अनेक तक्रारी जिल्हा उपनिबंधक लातूर यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी मंगळवारी उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बाजारातील सर्व प्रतिनिधीच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहून आपापली मते मांडली.

जिल्हा उपनिबंधकांच्या सूचना

 कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या मालातून हमालांना मातरे व व्यापाऱ्यांना कडते देण्यात येऊ नये. जर कुणी मातरे व कडते दिल्यास त्यांच्यावर बाजार समितीच्या कायद्यान्वये कारवाई करावी.

 मोंढ्यातील सर्व मातऱ्याची दुकाने ताबडतोब बंद करावीत.

 हमालीच्या दराबाबत बाजार समितीने व्यापाऱ्याची स्वतंत्र बैठक घेऊन हमालीचे दर ठरवावेत.

 शेतकऱ्यांच्या मालाची आवक होत असताना योग्य नियोजन करून नोंदी ठेवाव्यात.

 सर्व शेतकऱ्यांना पक्की पावती द्यावी.

 वारंवार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT