Pune News : जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, नदी नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी, पशुधन पाण्यासाठी व्याकूळ झाले असताना, मात्र कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणावर असलेल्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून ऐन दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कालवा शेजारील जमिनीत पाणी साचून जमीन खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणावर असलेल्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून कालव्याच्या कडेला असलेल्या जमिनींमध्ये पाणी साचत असल्याने त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने या कालव्याचे लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी पाण्याच्या गळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणावर असलेला कुकडी डावा कालवा हा पुणे व नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा महत्त्वपूर्ण कालवा आहे. हा कालवा येडगाव, पिंपळवंडी, बोरी, साळवाडी, झापवाडी निघोज, कर्जत, करमाळा या ठिकाणांपर्यंत २५० किलोमीटर अंतर असून कालव्याला जवळपास २५ ते ३० वर्षे झाल्याने कालव्याचे अस्तरीकरण निघाल्याने कालव्याची माती पाण्याने वाहून जाऊ लागली असून गळती होत आहे.
चार वर्षांपूर्वी कर्जत-करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तर गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात साकोरी गावच्या हद्दीत फुटून बाजूला असलेल्या शेतांमध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
तसेच हा कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला. त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. काही ठिकाणी तर कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु भविष्यात इतर ठिकाणी हा कालवा फुटू नये, यासाठी या संपूर्ण कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.