Vijay Wadettiwar On Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Vijay Wadettiwar : कृषिमंत्र्यांच्या कार्यक्रमात रश्मिका मंदानाची उपस्थिती; वडेट्टीवार यांची सडकून टीका, म्हणाले, 'असंवेदनशील कृषिमंत्री..'

Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : बीडमधील परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती महोत्सवाताचे आयोजन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला सिनेतारका रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनन उपस्थित होत्या.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती महोत्सवाताच्या उद्घाटनास सिनेतारका रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनन यांनी उपस्थिती लावली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. समाजमाध्यम एक्सवर रविवारी (ता.८) एका पोस्टमधून, कृषीप्रधान महाराष्ट्राचे असंवेदनशील कृषिमंत्री अशी टीका मुंडे यांच्यावर केली आहे.

वडट्टेवार यांनी मुंडे यांच्यावर गणपती महोत्सात सिनेतारकांना बोलावल्यावरून जोरदार टीका केली आहे. मुंडे कृषिप्रधान महाराष्ट्राचे असंवेदनशील कृषिमंत्री आहेत. तिकडे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३४४८ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. पण इकडे आपले कृषिमंत्री सिनेतारकांबरोबर कार्यक्रमात व्यस्त आहेत.

चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील शेतकऱ्याचा हंबरडा फोडून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबात ऐन सणासुदीच्या काळात नैराश्य आहे.

अश्या स्थितीत राज्याचे कृषिमंत्री करोडो रुपयांची उधळन करत आहेत. रश्मिका मंदना-क्रिती सेनन यांसारख्या महागड्या सिनेतारकांना आपल्या कार्यक्रमात बोलावून आनंद घेत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

सरकारच्या मदतीची आस लावून शेतकरी बसला आहे. मात्र केंद्र सरकारचे पथक साधे पाहणी करायला आलेले नाही. पण याचा पाठपुरावा कोण करणार? असा सवाल राज्य सरकारला शेतकरी करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार? केंद्रीय कृषिमंत्री नाही तर केंद्रीय पथक तरी मराठवाड्याचे नुकसान पाहायला येणार का?

महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार की नाही? मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा केली का? अशीही विचारणा शेतकरी करत आहेत. कारण राज्याचे कृषीमंत्री सिनेतारकांसोबत नृत्य करण्यात व्यस्त आहेत. महायुतीचे सरकार किती ढोंगी आहे आणि बळीराजाबाबत किती संवेदनशील आहे हेच आता स्पष्ट होत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

सरकारने लाडकी बहिणीसाठी पैसे रोखले

दरम्यान वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून देखील टीका केली आहे. कंत्राटदारांना पैसै दिलेले नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत थांबवली आहे. तर आता होमगार्डचा वाढीव भत्ता देखील देण्यात आलेला नाही.

गेल्या तीन महिन्यापासून अंगनवाडी सेविका आणि मदतनिस यांचे देखील मानधन थकवण्यात आला आहे. पोलिस पाटील आणि कोतवाल यांना देखील मानधन दिले जात नाही, असे आरोप वडेट्टीवार यांनी केले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारावर देखील २५ टक्के कट लावला गेला असून सर्व योजनांचे पैसे मुदतवाढ न देता थांबवण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT