Delhi Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Farmers Protest : हरियाणा सरकारला शेतकऱ्यांचा इशारा; तीन शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी २७ एप्रिल शेवटची मुदत

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अटकेत असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सुटकेवरून हरियाणा सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. तसेच '२७ एप्रिलपर्यंत तीन शेतकऱ्यांची सुटका न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल', असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दिल्लीच्या जवळ शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आणि शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. शेतकरी नेत्यांनी अटकेत असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सुटकेवरून हरियाणा सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. तसेच 'या शेतकऱ्यांची २७ एप्रिलपर्यंत सुटका न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल', असा इशारा शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिला आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, सोमवारी (ता.२२) रोजी जींद जिल्ह्यातील खातकर गावात शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली-पटियाळा महामार्गावर एक तास चक्काजाम केला होता. यादरम्यान डल्लेवाल म्हणाले, हा केवळ प्रतिकात्मक रास्ता रोको करण्यात आला आहे. पण सरकारने अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची सुटका न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. 

'शेतकऱ्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसल्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज करणार नाही. आम्ही फक्त सहकारी शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत. पण राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करून शांततेत सुरू असणारे आंदोलन चिरडत आहे. यामुळे आता २७ एप्रिलपर्यंत सरकारला मुदत देण्यात आली आहे. जर दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. तसेच अटकेत असलेल्या शेतकऱ्यांना सोडले नाही. तर अनिश्चित काळासाठी रेल्वे रोको किंवा रस्ते रोको केला जाईल', असेही डल्लेवाल यांनी म्हटले आहे.

खनौरी सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत २१ वर्षीय शेतकरी शुभकरन सिंह याचा मृत्यू झाला होता. यावरून खटकर टोल प्लाझा येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जींद पोलिसांनी अनिश खतकर या शेतकऱ्याला अटक केली होती. तसेच गुरकीरत सिंग आणि नवदीप जलबेरा यांना देखील मोहालीच्या शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ताब्यात घेण्यात आले होते. 

यावरून शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. या शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी शंभू सीमेवर १७ एप्रिलपासून रेल्वे रोको आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे आंदोलनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. तर फिरोजपूर विभागातील ४९४ गाड्या प्रभावित झाल्या असून १७१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT