Solar Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power Project : लासलगावचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

Solar Energy : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौरकृषी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शासनाचा कोळशावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीजनिर्मितीला चालना मिळणार आहे.

कोळशावर आधारित वीजनिर्मितीला सरकारला जास्त खर्च येतो, तर सौरऊर्जेद्वारे कमी खर्च होत आहे. कोळसा साठ्याचे आयुष्य ५०-६० वर्षांपर्यंतच असल्याने भविष्यात ऊर्जानिर्मितीसाठी सौर प्रकल्प सक्षम पर्याय ठरणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प लासलगावमधील हा प्रकल्प राज्यातील वीज वितरण कंपनीचा दुसऱ्या क्रमांकाचा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यातील वावी येथे सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सौर प्रकल्पाची क्षमता - १.०८५ मेगावॉट

एकूण क्षेत्रफळ - पाच एकर

एकूण सोलर पॅनेल्स- ३,४०० (निर्माता-भेल)

दररोजची वीज निर्मिती- चार हजार युनिट

इन्व्हर्टर क्षमता- १ मेगावॉट (कंपनी-हिताची)

प्रकल्पस्थळ- ३३/११ के.व्ही. लासलगाव उपकेंद्र

सौर प्रकल्प राज्यातील शाश्वत वीजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, पर्यावरणपूरक आणि स्वस्त वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जेचा प्रभावी वापर हा महाराष्ट्राच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
- सुनील ठोंबरे, बांधकाम व्यावसायिक, लासलगाव
सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती हा उत्तम पर्याय आहे. महावितरणद्वारे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम करण्यात येत आहे. पीएम सूर्यघर या योजनेत सहभाग घेऊन घरच्या छतावर सौरऊर्जा युनिट बसवावे आणि देशाच्या वीजनिर्मितीमध्ये सहभागी व्हावे.
- अजय सावळे, सहाय्यक अभियंता, लासलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil Protest: 'मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेऊ, पण...'; मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

HTBT Cotton Seeds: बुलडाण्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांवर कारवाई

Agriculture Department Action: पैठण तालुक्यात २० टन अनधिकृत खतसाठा जप्त

Custard Apple Orchard Planning: हवामान बदलामध्ये सीताफळ बागेचे नियोजन

Climate Crisis Looms Over India: किनारपट्टी भागात हवामान बदलाचा गंभीर परिणाम; आरोग्य आणि व्यवसायांना बसणार फटका, अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल

SCROLL FOR NEXT