Orange Alert Update: सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बुधवार (ता.२४) सकाळपासून देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत. पावसामुळे काही भागांत पडझडीचे प्रकार झाले आहेत. काही भागात वीजपुरवठा देखील खंडीत आहे. जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला आहे..जिल्ह्यात सोमवारी (ता.२२) रात्री आणि मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यानतंर रात्री देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. या पावसामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागात झाडे वीजवाहिन्यांवर उन्मळून पडली. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला..Crops In El Nino: बाजरीच्या लागवडीचे यंदा तिहेरी फायदे.काही ठिकाणी वाहतुक देखील विस्कळीत झाली. जिल्ह्यातील वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला, तर अन्य तालुक्यात देखील पावसाचा जोर आहे. या पावसामुळे आतापर्यंत कोरडे पडलेले नदीनाले प्रवाहीत झाले आहेत..Jowar Farming Tips: चांगल्या उत्पादनासाठी ज्वारी लागवडीचे नियोजन कसे करावे? .तालुकानिहाय पाऊस (मिमी) देवगड २७, मालवण ४४, सावंतवाडी ६७, वेंगुर्ला ५१ , कणकवली ८२, कुडाळ ६०, वैभववाडी ८५, दोडामार्ग ७३, सिंधुदुर्गात आज व उद्या आँरेज अलर्ट जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे..हवामान विभागाने २५ आणि २६ रोजी आँरेज अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला असून, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता देखील आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.