Lasalgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon APMC : लासलगाव बाजार समितीमध्ये सभापतींना ११ संचालकांचे आव्हान

APMC Politics : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुचवलेल्या नावाप्रमाणे डी. के. जगताप सभापतीपदी तर ललित दरेकर हे उपसभापती झाले.

Team Agrowon

Nashik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुचवलेल्या नावाप्रमाणे डी. के. जगताप सभापतीपदी तर ललित दरेकर हे उपसभापती झाले. मात्र निवडीवर संचालकांची नाराजी होतीच. त्याचे पडसाद पहिल्या बैठकीतच उमटले. विचारात घेत नसल्याने सभापतींना ११ संचालकांनी आव्हान दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत जगताप हे छगन भुजबळ यांच्यासोबत असल्याने त्यांना सभापती देण्यात आल्याचे बोलले जाते. सभापती निवड प्रक्रियेत भुजबळ यांच्या शब्दाला मान देत संचालकांनी सभापती- उपसभापती पदाच्या निवडीत अनुकूलता दाखवली; मात्र उपसभापतिपदाला संचालकांचा विरोध होता.

तोच विरोध पुढे पहिल्या बैठकीत उफाळून आला. पहिल्या बैठकीत कोरम पूर्ण झाल्याने बैठक रद्द झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी बैठकीत विरोध पाहायला मिळाला. ११ संचालकांनी लेखी अभिप्राय नोंदवले. त्यामुळे नाशिक बाजार समितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

सभापतिपदाच्या निवडीनंतर काही दिवसांतच येथे अंतर्गत विरोधाचा नवा अंक पाहायला मिळाला. संचालक मंडळाची पहिली बैठक गणपूर्तीअभावी स्थगित झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत नाराज संचालकांनी बैठकीचा उद्देश उधळून लावत नाराज ११ संचालकांनी अभिप्राय नोंदविले आहेत.

नोंदविल्या गेलेल्या अभिप्रायामध्ये प्रामुख्याने सह्यांचे अधिकार, प्रामुख्याने बांधकाम, वांदा निवारण, सेवक, प्रतवारी, नियमन व उपबाजार आवारे अशा उपसमित्यांवर नियुक्ती संदर्भात लेखी देण्यात आले आहे. ज्येष्ठ संचालकांना विचारात न घेतल्याने ही धुसफूस समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व संचालकांना सोबतीने घेऊन जगताप यांना काम करावे लागणार आहे अन्यथा विरोध तीव्र होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

विरोधात संख्याबळ अधिक

सत्ताधारी गटात सभापती जगताप, उपसभापती ललित दरेकर, जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, छबूराव जाधव, प्रवीण कदम आणि सुवर्णा जगताप हे सात संचालक आहेत. तर प्रतिस्पर्धी गटात ज्येष्ठ संचालक माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, यांसह डी. के. आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, गणेश डोमाडे, भाऊराज काळे, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे आणि रमेश पालवे असे ११ संचालक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT