Lasalgaon Market Committee
Lasalgaon Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon Market Committee : लासलगाव बाजार समिती यंदा प्रथमच ३१ मार्चला सुरू राहणार

Team Agrowon

Nashik News : राज्य शासनाच्या कांदा अनुदान योजनेचा (Onion Subsidy Scheme) लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी व्यापारी बांधवांनी येत्या ३० व ३१ मार्चला कांदा लिलाव सुरू ठेवावेत, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली होती.

त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यंदा या दोन्ही दिवशी बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी या दोन दिवशी विक्री केलेल्या कांद्याचा अनुदानासाठी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ पर्यंत खरीप लाल कांदा अनुदान योजना प्रतीक्विंटल ३५० रुपये जाहीर केली आहे.

परंतु मार्च वर्षअखेर बँका बंद राहत असल्याने व्यापारी लिलाव प्रक्रिया चार ते पाच दिवस बंद ठेवतात. मात्र २७ मार्चला कांदा अनुदान जाहीर झाले असून लिलाव बंद राहिले तर अनेक शेतकरी आपला कांदा ३१ मार्चअखेरपर्यंत विकू शकणार नाहीत.

यामुळे त्यांना शासनाचे कांदा अनुदान न मिलाल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख पाटील यांनी सर्व कांदा व्यापाऱ्यांकडे लिलाव ३० व ३१ मार्चला सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पाटील, जनार्दन पवार, केशवराव जाधव, राम बोराडे, राहुल शेजवळ, चैतन्य पवार आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन गुरुवारी (ता. ३०) दुपारी एकपर्यंत व शुक्रवारी (ता. ३१) बँका बंद असूनदेखील कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

कांदा व्यापारी पुरषोत्तमशेठ चोथानी, बाळासाहेब दराडे, मनोज जैन, प्रवीण कदम, अनिल आब्बड, ऋषभ राका, संदीप सिन्हा, राकेश शिंदे, धनंजय शिंदे, दत्तू खाडे, सोनू केदारे, जीवन पगारे, विलास गुंड पाटील, नाना कोकणे, कांदा मार्केट निरीक्षक काकासाहेब जगताप, संदीप निकम, गौरव निकम, राहुल शेजवळ, सचिन जोशी, शेतकरी बांधव व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT