Landslide  Agrowon
ॲग्रो विशेष

Disaster Management : पोलादपूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Maharashtra Monsoon Planning : मे महिन्यात पावसाने दाणादाण उडवली असून, राज्यातील काही भागात नैसर्गिक आपत्ती घडली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह जिल्हा स्थानिक पातळीवर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

Team Agrowon

Poladpur News : मे महिन्यात पावसाने दाणादाण उडवली असून, राज्यातील काही भागात नैसर्गिक आपत्ती घडली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह जिल्हा स्थानिक पातळीवर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी आपत्ती निवारण आराखडा व मार्गदर्शक सूचनांना गती देणे गरजेचे बनले आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीच्या हंगामात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील काही ठिकाणी पडलेले वृक्ष व रस्त्यावर आलेली माती प्रशासनाने तातडीने दूर केली असली तरी येणाऱ्या पावसात यंत्रणा सुसज्ज असणे क्रमप्राप्त बनले आहे.

पोलादपूर तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका असून, अनेक कातकरी, धनगर कुटुंबे उंच डोंगरात कड्या कपारीत वास्तव्य करतात. वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५०० ते ४००० मि.मि. पाऊस, तसेच महाबळेश्वर पर्वतरांगात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला येणाऱ्या पुरामुळे येथील जनजीवन विस्‍कळित होते. तसेच दरड कोसळण्यासारख्या आपत्तीही घडतात, शिवाय मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत असते.

पोलादपूर तालुका हा रायगड जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने संपूर्ण डोंगरी म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळे व २० तलाठी सज्जे मिळून ८८ गावांमध्ये २१२ वाड्यांचा समावेश होतो. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४५ हजार ४६४ एवढी आहे.

पोलादपूर तालुक्याच्या हद्दीलगत महाड, खेड, या दोन तालुक्यांची व सातारा जिल्ह्यातील हद्द जोडून आहे. तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच एकमेव व्यवसाय असून, भात हे प्रमुख पीक आहे.

तालुक्यामधून सावित्री ही एक प्रमुख नदी वाहते. त्यांच्या काठावरील एकूण चार गावांना कमी अधिक प्रमाणामध्ये पुराचा धोका संभवतो. तसेच याशिवाय तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६- (मुंबई-गोवा) रस्ते अपघाताची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT