Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला मिळणार ‘लाडकी बहीण’चा हप्ता

Women's Financial Aid : रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलैचा हप्ता ९ ऑगस्टपूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण ७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे.

Team Agrowon

Pune News: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट १५०० रुपयांची मासिक मदत जमा केली जाते.

रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलैचा हप्ता ९ ऑगस्टपूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण ७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे.

या योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून, पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्‍चित केले गेले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्‍वासात लक्षणीय वाढ झाली आहे.

या निर्णयाचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करताना नमूद केले, की हा निर्णय आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads: १२ फूट पाणंद रस्त्यांसाठी योजनेचा आराखडा तयार; सप्टेंबर अखेरीस मंत्रिमंडळासमोर

Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर

Coconut Farming : बेभरवशाच्या मासेमारीला मिळाला नारळ उद्योगाचा पर्याय

River Pollution Control : नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण

Agriculture Warehouse: ट्रस्ट पावती : बँक आणि कर्जदार यांच्यातील द्विपक्षीय व्यवस्था

SCROLL FOR NEXT