Women Empowerment : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपक्रमांची अंमलबजावणी करणार

Lakhpati DIdi Yojana : : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडिट सोसायटी यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
Women Empowerment
Women Empowerment Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडिट सोसायटी यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे चार लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी गुंतवणुकीवरही भर दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तीनदिवसीय सेवा संकल्प शिबिराचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. ८) पार पडले. या वेळी त्या बोलत होत्या.

गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिंतूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बेनिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गिते, संगीता चव्हाण, संगीता सानप उपस्थित होत्या.

Women Empowerment
Women Empowerment: स्त्रियांच्या समान संधीत सर्वांचेच हित

पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात येणार असून, अठरा महिन्यात इमारतीचे काम पूर्ण केले जाईल. पाच किलोमीटरच्या आत नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभागप्रमुखांना एक गाव दत्तक देण्यात आले आहे.

Women Empowerment
Women Empowerment Scheme : लाडक्या बहिणींसाठी ‘ताराराणी महिला कर्ज योजना’

राज्यमंत्री भोयर म्हणाले, की क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून महिलांनी उद्योग सुरू करावेत. सेवा सहकारी संस्थाद्वारे शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करावी. संगीता चव्हाण म्हणाल्या, की बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी सुरू केली. या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली आहे.

महिलांनी स्वत:हून क्रेटिड सोसायटी स्थापन करून महिलांची बँक सुरू करावी. आत्मविश्‍वासाने उद्योगही सुरू करावेत. बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. बचत गटाचे स्टॉल सहभागी झाले. या शिबिरात गुरुवारी (ता. १०) सर्वांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com