Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : लाडेगाव होणार ‘जलतारा’चे रोल मॉडेल

Jalatara Project : वाशीम जिल्ह्यामध्ये जलस्रोतांचे प्रमाण फार कमी आहे. या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती पाहता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील लाडेगाव या गावाला जलतारा योजनेचे रोल मॉडेल बनविण्यासाठी निवड करण्यात आली असून, जिल्हा प्रशासन, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, भारतीय जैन संघटनेच्या वतीने प्रगतिशील शेतकरी जलतज्ज्ञ पवन मिश्रा, तसेच सरपंच, ग्रामस्थ व सामाजिक संघटनांकडून आयोजित संयुक्त बैठक झाली. यामध्ये लाडेगावात ३० दिवसांत १५०० जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याचा संकल्प घेण्यात आला.

वाशीम जिल्ह्यामध्ये जलस्रोतांचे प्रमाण फार कमी आहे. या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती पाहता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही. त्यामुळे उपलब्ध परिस्थितीनुसार त्यावर मात करणे जरुरी आहे.

भविष्यात वाशीम जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई तीव्र रूप धारण करू शकते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने जलतारा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यामध्ये १० लाख शोषखड्डे शेतामध्ये व ई-क्लास जमिनीवर निर्माण करण्यात येणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई होणार नाही. या शोषखड्ड्यांमुळे पाण्याचा साठा वाढेल व जमिनी सुद्धा ओलिताखाली येऊन शेतकऱ्‍यांना मोठा लाभ मिळेल.

या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, आर्ट लिव्हिंगचे डॉ. हरीष बाहेती, भारतीय जैन संघटनेचे निलेश सोमाणी, सुभाष नानवटे, जलतज्ज्ञ पवन मिश्रा, सचिन कुळकर्णी, डॉ. निलेश हेडा, समाजसेवक श्याम सवाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, गुरुदेव सेवा मंडळाचे आनंदराव गादे, मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मनोज इंगोले, लाडेगावच्या सरपंच अर्चना चक्रनारायण, सिरसोलीच्या सरपंच रेखा रामटेके, उपसरपंच सुवर्णा लाड व ग्रामपंचायत सदस्यांसमवेत मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon: मॉन्सूनची आगेकूच

Red Sandalwood Case: ‘लाल चंदन’प्रकरणी शेतकरी कुटुंबाला उच्च न्यायालयाची तंबी; ५० लाख जमा करण्याचे आदेश

Maharashtra Monsoon Rain: कोकणात पावसाचा जोर वाढणार

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

SCROLL FOR NEXT