KVK  Agrowon
ॲग्रो विशेष

KVK Washim : वाशीमच्या ‘केव्हीके’ने केले तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य ; ‘ॲग्रोटेक’कृषी प्रदर्शनास विविध मान्यवरांची भेट

PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरदरम्यान झालेल्या ‘ॲग्रोटेक’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात वाशीम कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) तंत्रज्ञान प्रसारासाठी दालन ठेवले होते.

Team Agrowon

Akola News : अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरदरम्यान झालेल्या ‘ॲग्रोटेक’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात वाशीम कृषी विज्ञान केंद्राने  (केव्हीके) तंत्रज्ञान प्रसारासाठी दालन ठेवले होते. खासदार अनुप धोत्रे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देत कौतुक केले.

कृषी विज्ञान केंद्राच्या दालनात नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेतीचे मॉडेल, उन्नत पीक वाणांवर आधारित तांत्रिक शेती, ॲझोला उत्पादन, कुक्कुटपालनासाठी ‘सोनाली’ जातीचे पक्षी आणि बटेरपालन, एकात्मिक शेती पद्धती, शेतीपूरक व्यवसायांसाठी संसाधनावर आधारित तंत्रज्ञान, शोभिवंत माशांचे ॲक्वेरियम, सेंद्रिय शेती, गांडूळखत उत्पादन, महिलांचे श्रम कमी करणारी औजारे व यंत्रे, तसेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादित विविध निविष्ठा यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांसाठी कृषि विज्ञान केंद्राने प्रकाशित केलेली पुस्तके आणि माहितीपर साहित्यही या दालनात उपलब्ध करून देण्यात आले. केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कार्यरत बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे दालनही प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या दालनास खासदार अनुप धोत्रे, कुलगुरू डॉ. शरद गडाख, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदिरवाडे, डॉ. नितीन कोष्टी, रेशीम संचालनालयाचे संचालक डॉ. महेंद्र ढवळे आदींनी भेट देऊन कौतुक केले.

कृषी प्रदर्शनादरम्यान वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. आर.एल. काळे, शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले, आर. एस. डवरे, एन.बी. पाटील, टी. एस. देशमुख, शुभांगी वाटाणे, मयूर देशमुख, प्रमोद देशमुख, आर. व्ही. कोठाळे आणि प्रकल्पातील कर्मचारी राम देशमुख, दत्ता काळे, अर्चना कदम, प्रविण जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनामुळे शेतकरी बांधवांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसायांचे नव्या संधी, आणि शाश्वत शेतीसाठी नवनवीन उपाय योजनांची माहिती मिळाली, ज्याचा त्यांना निश्चितपणे लाभ होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT