Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Kumbhi Water Storage : ‘कुंभी’चा साठा जूनअखेरपर्यंत पुरणार

Water Stock : गगनबावडा, पन्हाळा व करवीर या तीन तालुक्यांतील सुमारे ५४ गावांना सुजला सुफला करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पांत १२ फेब्रुवारीअखेर ८१ टक्के पाणीसाठा शिल्‍लक आहे.

Team Agrowon

Kolhapur News : गगनबावडा, पन्हाळा व करवीर या तीन तालुक्यांतील सुमारे ५४ गावांना सुजला सुफला करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पांत १२ फेब्रुवारीअखेर ८१ टक्के पाणीसाठा शिल्‍लक आहे.

तालुक्यातील उर्वरित ३ लघू पाटबंधारे प्रकल्पांत ७० ते ७६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्‍लक आहे. तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पामध्ये शिल्‍लक असलेला पाणीसाठा पिण्यासह सिंचनासाठी ३० जूनअखेर पुरेल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

गगनबावडा तालुक्यात लखमापूर येथील कुंभी या प्रमुख मध्यम प्रकल्पासह अणदूर, कोदे व वेसरफ हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. पावसाचे आगार असलेल्या गगनबावडा तालुक्यात चालूवर्षी झालेल्या पावसाने तालुक्यातील सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले.

तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७१ टीएमसी आहे. १२ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील अणदूर लघू प्रकल्पात ४.०१ दलघमी (६९.७४ टक्के), कोदे लघू प्रकल्‍पात ४.६४ दलघमी (७६.५७ टक्के), वेसरफ लघू प्रकल्पात २.४५ दलघमी (७२.७० टक्के) तर कुंभी मध्यम प्रकल्पात ६२.११ दलघमी (८०.७९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

५४ गावांतील पिकांचा आधार

गगनबावड्यासह पन्‍हाळा व करवीर या तीन तालुक्‍यांतील सुमारे ५४ गावांतील ८ हजार ७११ हेक्टरमधील पिके सिंचनासाठी या प्रकल्पावर अवलंबून आहेत. या प्रकल्पातील पाणी कुंभी नदीत सोडले जाते. बॅक वॉटर पद्धतीने कळे बंधाऱ्यातून या प्रकल्पाचे पाणी धामणी नदीत सोडावे लागते.

कुंभी मध्यम प्रकल्पात २.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणी पिण्यासह सिंचनासाठी जूनअखेरपर्यंत पुरेल, असे नियोजन केले आहे. तालुक्यातील सर्वच प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा शिल्लक असला तरी शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कळे पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT