Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : कृष्णा नदी पुन्हा कोरडी

Drought Update : कोयना धरणातून सोडलेले पाणी टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचलले जात असल्याने नदीचा प्रवाह खोळंबला आहे.

Team Agrowon

Sangli News : कोयना धरणातून सोडलेले पाणी टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचलले जात असल्याने नदीचा प्रवाह खोळंबला आहे. परिणामी, सांगली बंधाऱ्याजवळ कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे.

नदीतील वाळू दिसू लागली आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाने कसबे डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. यावर्षी हे पुन्हा पुन्हा घडत असल्याने सांगलीकरांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी गणपती उत्सवापासून सातत्याने कृष्णा नदी कोरडी पडण्याचे सत्र सुरु आहे. दिवाळीत तीच वेळ आली होती. त्यात राजकीय हस्तक्षेपाचे कारण समोर आले होते. वाद झाला होता. त्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती.

तसे घडलेले दिसत नाही. कोयना धरणातून टेंभू, ताकारी योजनांच्या आवर्तनासाठी पाणी सोडले आहे, मात्र त्याचा वेग कमी आहे. परिणामी, सांगलीपर्यंत पाणी पोहचत नाही.

आता डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या, ‘‘सिंचन योजनांसाठी पाणी उपसा सुरु असल्याने सांगलीपर्यंत पाणी येण्यात अडचणी होत्या. आम्ही डिग्रज बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. ते सांगलीत पोहचेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT