Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : राज्यात सोमवारपासून कृषी संजीवनी पंधरवडा

Krishi Sanjeevani : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून (ता. १७) राज्यभर कृषी संजीवनी पंधरवडा राबविला जात आहे.

मनोज कापडे

Pune News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून (ता. १७) राज्यभर कृषी संजीवनी पंधरवडा राबविला जात आहे. या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधावर जाण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चालू होत असलेला पंधरवडा एक जुलैपर्यंत राहील. या कालावधीत कृषी खात्यासह कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, केंद्रीय संशोधन संस्थांमधील माहिती व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत बांधावर नेले जाईल.

त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालकांना रोज एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्याला रोज दोन गावात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कृषी पंधरवड्यात शासकीय योजना, हवामानावर आधारित पीक सल्ला, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतकरी यशोगाथा व शेतीमाल प्रक्रियेसंबंधी समूह माध्यमांद्वारे जागृती केली जाईल. त्यासाठी गावपातळील कृषी सहायकाकडून कार्यक्रम आयोजित केला जाईल.

त्याचे नियोजन कृषी पर्यवेक्षक करणार आहेत. राज्यभर ग्राम कृषी विकास समितीच्या बैठका घेतल्या जातील. पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

...असा साजरा होणार पंधरवडा

बीजप्रक्रिया जनजागृती दिन ः १७ जून

पीएम किसान उत्सव दिवस ः १८ जून

जमीन सुपीकता जागृती दिन ः १९ जून

गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा ओळख दिन ः २० जून

रोहयो फळबाग लागवड तंत्रज्ञान प्रसार ः २१ जून

पीकविमा जनजागृती दिन ः २२ जून

हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन ः २३ जून

सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान प्रसार दिन ः २४ जून

कापूस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान प्रसार दिन ः २५ जून

तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन ः २६ जून

महिला शेतकरी सन्मान दिन ः २७ जून

कीडरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय उपाययोजना ः २८ जून

शेतकरी मासिक वाचन दिन ः २९ जून

प्रगतिशील शेतकरी संवाद दिन ः ३० जून

कृषी दिन ः १ जुलै

शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घेत प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्द्यावर जागृती करण्याचे उद्दिष्ट कृषी पंधरवड्यात ठेवण्यात आले आहे.
- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT