Farmers Diwali agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Diwali : कोकणकरांची दिवाळी शिवारातच; पावसाने भात कापणी लांबणीवर, काही ठिकाणी भात पिकाचे नुकसान

Rice Harvest Damage : सुरुवातीपासून सप्टेंबरपर्यंत पाऊस राहिल्याने भात पीक जोमदार आले होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

sandeep Shirguppe

Konkan Rice Crop Damage : कोकणात मागच्या दोन आठवड्यापासून दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने शेतकरी हैराण झाले होते. परंतु, शनिवार (ता. २६) पावसाने विश्रांती घेतल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तालुक्यांमध्ये भात कापणी व झोडणीच्या कामाला वेग आला आहे.

दिवाळी तोंडावर आली असली, तरी शेतकरी आता दिवाळीपेक्षा शेतातील धान्य घरात आणण्याच्या कामात मग्न झाले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आतापर्यंत भाताची ६० टक्के कापणी पूर्णत्वास आली आहे.

सुरुवातीपासून सप्टेंबरपर्यंत पाऊस राहिल्याने भात पीक जोमदार आले होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली. अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे आडवी झाल्याने नुकसान झाले. आडव्या पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची वेळ आली. पाऊस विश्रांती घेत नसल्याने कापणीही करता येत नव्हती. दुपारपर्यंत कडकडीत ऊन आणि नंतर पाऊस अशीच परिस्थिती २५ ऑक्टोबरपर्यंत होती.

दिवाळी तोंडावर आली, तरी धान्य घरात येत नव्हते. काही ठिकाणी कापलेले भात सुकवणे यातच शेतकऱ्यांचा वेळ जात आहे. दरम्यान मागच्या ४ दिवसांपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण दिवस शेतातच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

न्याहारी, जेवणही शेतातच घेतले जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. अनेकांची दिवाळी सुरू झाली असली तरी दिवाळीपेक्षाही वर्षभराचे धान्य वेळेत घरी आणण्याची गडबड शेतकरी करत आहे.

सकाळी भात कापल्यानंतर दुपारनंतर लगेच झोडले जात आहे. त्यासाठी शेतातच खळी तयार करण्यात आली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी आता दिवाळी साजरा करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. पुढील आठ दिवसांत पंचक्रोशीतील कापणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी ही आता शेतातच साजरी होणार, असे काहीचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT