Shetkari Sangh Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या बैठकीतच हा आरोप केल्याने खळबळ उडाली.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh : शेतकरी सहकारी संघाच्या कार्वे (ता. चंदगड) शाखेत झालेल्या अपहाराची जबाबदारी एकट्यावरच निश्चित केली. पण, प्रत्येक महिन्याला मुख्य व्यवस्थापकाला १५ हजार रुपये देत होतो. त्याच मुख्य व्यवस्थापकाला एकूण २० लाख रुपये दिल्याचा आरोप अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या कार्वे शाखेचे माजी व्यवस्थापक शंकर इंगवले यांनी केला.

शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या बैठकीतच हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

शेतकरी संघाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला शेतकरी संघाच्या उत्पादन, नफा-तोटा याबद्दल चर्चा झाली. दरम्यान, याच बैठकीत कार्वे शाखेतील ७२ लाखांच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल झालेले शाखेचे व्यवस्थापक इंगवले आले. त्यांनी यापूर्वी झालेल्या अपहारामध्ये जे-जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली. कार्वे शाखेतील अपहारामध्येही अनेकजण सामील आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही.

कार्वे शाखेतील अपहाराला आपण एकटे जबाबदार नाही, तर संबंधित सर्व अधिकारी जबाबदार आहेत. यापैकी मुख्य व्यवस्थापकांना महिन्याला पंधरा हजार देत होतो. आतापर्यंत त्यांना वीस लाख रुपये दिले असल्याचा आरोप केला.

यामुळे बैठकीला उपस्थित सर्वच संचालक अवाक झाले. कोणाला काय बोलावे हे समजेना. ज्या व्यवस्थापकांवर आरोप केला, ते व्यवस्थापकही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, इंगवले जे काही बोलतात त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे म्हणून संबंधित व्यवस्थापकांनी थोडक्यात उत्तर दिले.

यावर शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, ‘कार्वे शाखेत झालेला अपहार हा आम्ही संचालक म्हणून येण्याआधी झाला आहे. चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली आहे. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत इंगवले यांनी व्यवस्थापक, लिपिकांसह अन्य लोकांवर आरोप केला आहे.

मात्र, इंगवले यांनी त्यांची ही बाजू चौकशीच्यावेळी सांगितली पाहिजे होती. तसेच त्यांना आता काही बोलायचे असेल तर न्यायालयात सांगितले पाहिजे. न्यायालय ज्या काही सूचना देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

IAS Varsha Meena: उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी मीना

Carbon Sequestration: कर्ब साठवणूक : कार्बन अर्थव्यवस्थेची संधी

LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’

Ganeshrao Deshmukh: ग्रामीण अर्थकारण बळकटीशिवाय विकसित भारत संकल्पना अपूर्ण : गणेशराव देशमुख

SCROLL FOR NEXT