Kolhapur Heavy Floods agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Heavy Floods : शेतकऱ्यांना महापुराचा फटका; ५० हजार लिटर दूध घरात, भाजीपाला कुजला

Kolhapur Vegetable Rate : कोल्हापूर बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे; याचा दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून आला आहे.

sandeep Shirguppe

Milk Production Decreased Kolhapur : मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्य आणि जिल्हा मार्ग बंद झाले आहेत याचा थेट परिणाम जिल्ह्यातील दूध व्यवसायावर झाला आहे. गोकुळ आणि वारणासारख्या लाखो लिटर दूध संकलन करणाऱ्या संस्थाचे दूध संकलन ग्रामीण भागात होत असते परंतु पूर परिस्थितीने दूध वाहतूक ठप्प झाली आहे.

मागच्या दोन दिवसातील सकाळ आणि संध्याकाळी असे मिळून जिल्ह्यात जवळपास जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक लिटर दूध शेतकऱ्यांच्या घरात राहिले आहे. तसेच कोल्हापूर बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे; याचा दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून आला आहे.

गोकुळचे ४१ हजार दूध संकलन घटलं

याबाबत जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाचे १७ लाख लिटर गाय आणि म्हैशीचे संकलन होत असते परंतु मागच्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली असल्याने दूध संकलनात घट झाली आहे.

काल सकाळी आणि संध्याकाळी २७ हजार लिटर दूध संकलन कमी झाले होते तर आज सकाळच्या अहवालानुसार १४ हजार लिटर गाय आणि म्हैशीचं दूध संकलन कमी झाले आहे. दोन दिवसात मिळून जवळपास ४१ हजार लिटर दूध संकलन कमी झाल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

ओल्या चाऱ्याची टंचाई

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय असल्याने जनावरांच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची तजवीज शेतकरी करत असतो. ओला चारा म्हणून हत्ती गवत व ऊसांच्या पाल्याचा वापर होतो. परंतु मुसळधार पावसामुळे नदीच्या पुराचे पाणी आठ दिवसांपासून उतरले नाही. हे पाणी नदीकाठावरील शिवारात पसरल्याने उसाचा पाला उपलब्धता कमी झाली आहे. याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.

दूध उत्पादन घटलं

आडसाली उसात मोठ्या प्रमाणात पाला आलेले असतो परंतु होत असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या पुराच्या पाण्याखाली हिरवी वैरण बुडाली आहे. तर माळरानावरील उपलब्ध असणारी वैरण भिजल्याने कुबट वास सुटला आहे. यामुळे जनावरांना घालण्यासाठीचा चारा प्रश्न गंभीर होत आहे. हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने दुभत्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली असल्याची माहिती दूध उत्पादक महिला शेतकरी सुवर्णा आवटे यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT