Gokul Milk Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Kolhapur Heat Wave : कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेली उष्णता, चाऱ्याअभावी प्रत्येक उन्हाळ्यात दूध संकलनात सरासरी घट होत असते.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh : यंदा तापमान वाढल्याने लोकांसह अन्य घटकांनाही उन्हाळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान दुधाळ जनावरांना याचा मोठा फटका बसत आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात मोठी घट होत असते. परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे दोन लाख ३७ हजार ८८१ लिटर दूध संकलन वाढले आहे.

म्हशीच्या दुधात ६७ हजार ३७९ हजार लिटर, तर गायीच्या दुधात एक लाख ७० हजार ५०२ लिटरने वाढ झाली आहे. सध्या 'गोकुळ'चे एकूण दूध संकलन १५ लाख २९ हजार ३०२ होत आहे. 'गोकुळ'ने गेल्या दोन-तीन वर्षांत गाय व म्हैस खरेदीला प्रोत्साहन दिले. त्यातून सुमारे चार हजार म्हशी खरेदी केल्या आहेत. याचाच परिणाम दूध उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात वाढलेली उष्णता, चाऱ्याअभावी प्रत्येक उन्हाळ्यात दूध संकलनात सरासरी घट होत असते. प्रतिवर्षी एप्रिल, मे, जूनदरम्यान म्हैस व गाय या दोन्ही प्रकारच्या दुधामध्ये घट होत असते. याउलट प्रतिवर्षी असणाऱ्या तापमानापेक्षा यंदा कोल्हापूरचा पारा ४१ डिग्री ते ४२ डिग्रीपर्यंत वाढला आहे. अशा तापमानात दूध संकलनात घट होईल, असा अंदाज होता. मात्र, उलट संकलात वाढ झाली आहे.

'गोकुळ'कडून गेल्या दोन-अडीच वर्षांत म्हैस खरेदीसात्र ४० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे बाहेरच्या राज्यांतील किंवा जातीच्या म्हैस खरेदी करणाऱ्यांसाठी ही योजन आजही सुरू आहे. याशिवाय जनावरांसाठी दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांवर भर, दूध उत्पन्नवाढीसाठ गोकुळ प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी २ मे २०२३ रोजी संकलित झालेल्या १२ लाख ९२ हजार ४२१ लिटर दुधामध्ये यावर्षी तब्बल २ लाख ३७ हजार ८८१ लिटरची वाढ दिसून येत आहे.

'गोकुळ'कडून सध्या प्रतिदिन सरासरी १५ लाख २९ हजार ३०२ लिटर दूध संकलन होत आहे. हे लक्ष्य आता २० लाख लिटरपर्यंत नेले जाणार आहे. दरम्यान, गाय दुधालाही प्रतिलिटर सरासरी ३३ रुपये दर दिला जात आहे. हा दर इतर संघांपेक्षा चांगला असल्याने इतर संघांना घातले जाणारे गायीचे दूध 'गोकुळ'कडे येत आहे.

यावर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की, दूध उत्पादकांसाठी 'गोकुळ' विविध योजना राबवत आहे. म्हैस दूध वाढीसाठी अनुदान आणि गायीच्या दुधा चांगला दर दिला जात आहे. बातच सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांकडून दूध उत्पादन वाढीसाठी सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांमुळे दूध संकलनात वाढ झाल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

Agri Union Budget: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा

Union Budget 2026-27: कर्तव्यांच्या त्रिसूत्रीवर अर्थसंकल्पाचा भर

Maharashtra Winter Weather: उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT