Kolhapur Bribe Case agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Bribe Case : 'कुंपणच जेव्हा शेत खाते' जिल्हा भूमी अधीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Land Superintendent : तक्रारदाराची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांच्या नावे लागली होती. यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.

sandeep Shirguppe

Bribe Case Kolhapur : सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना वर्ग-१ चा अधिकारी जिल्हा भूमी अधीक्षक आणि पाच हजारांची लाच घेताना चालक यांना एसीबीने जाळ्यात अडकवले. कोल्हापूर जिल्ह्यातील अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात काल (दि.०३) दुपारी ही कारवाई केल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

भूमी अधीक्षक सुदाम दादाराव जाधव (वय ५०, सध्या. पुण्यप्रवाह सोसायटी, फ्लॅट क्रमांक ३०३, नागाळा पार्क, कोल्हापूर, मूळ रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि वाहनचालक उदय लगमाना शेळके (४० वर्ष रा. कणेरीवाडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर) यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे

सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांच्या नावे लागली होती. ही शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या अन्य सह हिस्सेदारांच्या नावे करायची होतो. त्यासाठी पुणे येथील उपसंचालक भूमिअभिलेख या प्रादेशिक कार्यालयाकडे २०१८ मध्ये अर्ज केला होता.

तक्रारदार यांच्या या प्रलंबित अर्जाची सुनावणी बुधवार पेठेतील भूमिअभिलेख अधीक्षक यांच्या समक्ष सुरू करण्याचे आदेश उपसंचालक यांनी दिले आहेत. या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मध्यस्थी करून साहेबांचे दहा आणि स्वतःचे पाच हजार द्यावे लागतील, असे वाहनचालक शेळके याने सांगितले होते.

याबाबत तक्रारदाराने एसीबीच्या शनिवार पेठेतील कार्यालयात तक्रार दिली होती. काल दुपारी बुधवार पेठेतील जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तेथे लाचखोर जाधव याने दहा हजार स्वीकारले, तर वाहनचालकाने कार्यालयाच्या दारात पाच हजार स्वीकारले.

यावेळी त्यांना रंगेहातथ ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केल्याची माहिती ही श्री. नाळे यांनी दिली. पोलिस निरीक्षक बापू साळुंके पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील आणि सुधीर पाटील, कॉन्स्टेबल सूरज अपराध, चालक विष्णू गुरव आदींनी ही कारवाई केली. जाधवच्या घराची झडती

सुदाम जाधव याने शनिवार पेठेतील भूमिअभिलेख कार्यालयात यापूर्वी काम केले आहे. त्याच कार्यालयाच्या इमारतीत आज एसीबीच्या कार्यालयात त्याला अटक करून आणण्यात आले. पोलिसांनी जाधव याच्या नागाळा पार्क, धाराशिव येथील घरी तर शेळकेच्या कणेरीवाडी येथील घराची झडती सुरू असल्याचे श्री. नाळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT