Kolhapur Water Shortage agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्याला पाणी टंचाईची शक्यता

Geologist : पेरणोली व किटवडे या पंचक्रोशीतील गावे व वाड्यावस्तींवर भूवैज्ञानिक संतोष गोंधळी यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

sandeep Shirguppe

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये सायफनवर आधारित पाणीपुरवठा असलेली गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई तयार होण्याची शक्यता आहे. यावर प्रशासनाने गतीने हालचाली सुरू केल्या आहेत. पेरणोली व किटवडे या पंचक्रोशीतील गावे व वाड्यावस्तींवर भूवैज्ञानिक संतोष गोंधळी यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडे गावाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हंटले जाते या गावात सर्वाधिक पावसाची नोंद होते. परंतु या गावातच सध्या पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान यावर भूवैज्ञानिकांकडून पाहणी करण्यात येत आहे.

संबंधित गावात भविष्यात पाणीटंचाईचे संकट तयार झाले तर तातडीने उपाययोजना राबविता येतील, यासाठी भूवैज्ञानिकांची भेट महत्त्वपूर्ण असल्याचे पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता महादेव तिवले यांनी सांगितले, वाटंगी पैकी मोरेवाडी व मोरेवाडी धनगरवाड्यावर तीव्र पाणीटंचाई आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी कूपनलिकांचे अधिग्रहण केले आहे. येथे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिला व पुरुषांच्या रांगा लागत आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या गावात सायफन पद्धतीने पाणीपुरवठा होतो तेथे काही दिवसांत पाणीटंचाईचे संकट तयार झाले आहे.

जंगलातील झरे आटल्यामुळे ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भूवैज्ञानिक संतोष गोंधळी यांनी पेरणोली पैकी नावकरवाडी, वझरे पैकी घागरवाडी, हरपवडे, किटवडे, आंबाडे, लिंगवाडी येथे भेट दिली. गोंधळी अहवाल देणार आहेत. कनिष्ठ अभियंता ए. एस. मोरे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Dispute Cases: तडजोडनामा ते अंतिम निकाल; जमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

Slaughterhouse Waste Recycling Business: कत्तलखान्यातील टाकाऊ पदार्थांपासून उद्योगनिर्मिती

Biogas Subsidy: गॅस सिलिंडरची चिंता मिटेल; शेतकऱ्यांसाठी बायोगॅस योजना, किती मिळते अनुदान?

Soldier Village Story : ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू...

PF Withdrawal Rules: नोकरी सोडल्यानंतर लगेच पीफ काढता येणार नाही; जाणून घ्या कामगार व रोजगार मंत्रालयाचे नवे नियम

SCROLL FOR NEXT