Kolhapur Animal Husbandry Department agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Animal Husbandry Department : कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाकडून योजनांसाठी ५० लाखांपर्यंत अनुदान

ZP Animal Husbandry Department : शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Animal Husbandry Department : कोल्हापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामध्ये कुक्कुटपालन, शेळी- मेंढीसह वराह पालनासाठी अनुदान तत्वावर योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास योजनेतंर्गत वैयक्तिक, स्वयंसहाय्यता गटांना संधी दिली जाणार आहे.

जिल्हापरिषदेकडून काही नियम व अटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये शेळी-मेंढीसाठी स्वतःचा शेड असणे बंधनकारक आहे. यासाठी शंभर मादी व पाच नरासाठी १० लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. त्याच्यापुढे संख्या वाढेल तसे अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे. कुक्कुटपालनाठी स्वतःचे ३० बाय १०० फुटाचे शेड, इलेक्ट्रीक बृडर आदी सुविधांची गरज आहे. या प्रकल्पाची जास्तीत जास्त किंमत ५० लाख असून त्यापैकी ५० टक्के अनुदान शासन देणार आहे.

ही लागणार कागदपत्रे सविस्तर प्रकल्प अहवाल, स्वतःची जमीन असल्याबाबतचा पुरावा, स्वहिस्सा निधीबाबत पुरावा, पॅनकार्ड, कंपनी असल्यास नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षाचे लेखापरीक्षण अशी कागदपत्रे लागणार आहेत.

जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर म्हणाले की, या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना व पंचायत समितीशी संपर्क साधून जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे.

शेळी-मेंढी योजना ( १०० मादी व ५ नर) अनुदान - १० लाख (५० टक्के), शेळ्यांसाठी रोड - ११०० चौरस फूट, करडांचे शेड - ७०० चौरस फूट, वैरणीसाठी जागा - १, ते दीड एकर, वराह पालन (१०० मादी व १० नर) प्रकल्प किंमत - ६० लाख अनुदान - ३० लाख मादी वराहासाठी शेड २ हजार चौरस फूट, नर वराहासाठी शेड - ७०० चौ. फूट, गाभण मादीसाठी शेड -४ हजार चौरस फूट, पिल्लांचे शेड - ३० हजार चौ. फूट, स्टोअर रुम - ५०० चौरस फूट, कुक्कुटपालन (१ हजार पिल्ली), प्रकल्प किंमत - ५० लाख, रोड ३ हजार चौरस फूट, इलेक्ट्रीक बृडर - २ नग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT