Land Dispute : अर्जावरून नोंद लावणे बेकायदेशीरच

Property Dispute : एका गावात जानराव नावाचा एक शेतकरी राहत होता. शेजारीच अंबादास नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती.
Land Dispute
Land DisputeAgrowon
Published on
Updated on

शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com
Shekhar Gaikwad Article : एका गावात जानराव नावाचा एक शेतकरी राहत होता. शेजारीच अंबादास नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. जानरावने अंबादास नावाच्या शेतकऱ्याची जमीन कसायला अर्ध्या वाट्याने घेतली.

अंबादास आणि जानराव हे दोघेही चांगले विश्‍वासाचे मित्र होते. परंतु अंबादासने जानराववर एवढा विश्‍वास ठेवून जमीन कसायला दिली. सहा ते सात वर्षांनंतर अंबादासचा खोटा अंगठा लावून त्याने स्वतः अर्ज केला आहे असे दाखवून सातबारावर कब्जेदार सदरी स्वतःचे नाव जानरावने लावून घेतले.

त्या अर्जात असे नमूद केले होते, की माझी म्हणजे अंबादासची जमीन ही जानरावच्या नावावर करण्यात यावी. काही दिवसांनंतर ही बातमी अंबादासला समजली तेव्हा अंबादासने ताबडतोब जानरावच्या फेरफार नोंदीविरुद्ध अपील दाखल केले.

अपील दाखल करताना व केल्यानंतर बराच कालावधी उलटून गेला होता. काही वर्षांनंतर मात्र अपिलामध्ये ही नोंद रद्द करण्यात आली. अपिलाच्या निकालात असे म्हटले होते, की अर्जामुळे कोणताही हक्क निर्माण होत नाही. शिवाय या प्रकरणात कोणताही रजिस्टर दस्तऐवज केलेला नाही.

जानरावने नुसता अंबादासच्या हाताचा अंगठा घेऊन अर्ज दाखल केला होता. असा खोटा अर्ज दाखल करून सातबारावर कब्जेदार सदरी नाव लावून हक्क बजावणे ही फार मोठी चूक आहे. सातबारावर नाव लावण्यासाठी दोघांची संमती असणे गरजेचे आहे. तसेच ती नोंद रजिस्टर दस्तऐवज दाखल करून घेतली पाहिजे. सांगायचे तात्पर्य म्हणजे जमिनीत काहीही एक संबंध नसताना अर्जावरून नोंद लावण्याची कृती ही बेकायदेशीर आहे.

Land Dispute
Agriculture Land Dispute : म्हातारीचा बनावट वारस

नोंदणी नसलेला व्यवहार
एका गावात दीनानाथ व रंगनाथ नावाचे दोन शेतकरी राहत होते. दीनानाथची जमीन खालसा व रंगनाथची जमीन नवीन शर्तीची होती. रंगनाथची जमीन नवीन शर्तीची असल्यामुळे या जमिनीची त्याला विक्री करता येत नव्हती.

वारंवार आजारी पडत असल्यामुळे रंगनाथला पैशाची फार निकड होती. म्हणून दीनानाथच्या एक एकर जमिनीच्या बदल्यात नवीन शर्तीची दोन एकर जमीन रंगनाथने दीनानाथला देऊ केली. जास्त जमीन मिळणार म्हणून दीनानाथ पण तयार झाला.

रंगनाथची नवीन शर्त व त्याचे नाव दीनानाथच्या जमिनीवर आणि दीनानाथला रंगनाथची दुप्पट जमीन शर्तीशिवाय देण्याचा हा सौदा ठरला. दोघांनीही म्हणजे दीनानाथ व रंगनाथ यांच्या जमिनीची आपापसांत अदलाबदलीने विक्री करण्यासाठी प्रांत कार्यालयात परवानगी मागितली. जमीन अदलाबदलीनंतर एका जमिनीवरील नवीन शर्त हा शेरा दुसऱ्या जमिनीवर येईल हे दोघांच्याही लक्षात आले.

दीनानाथ व रंगनाथ यांनी प्रांत अधिकाऱ्याची परवानगी घेतली. प्रांत अधिकाऱ्याकडून परवानगी मिळाल्यानंतर रजिस्टर अदलाबदल दस्त न करता केवळ जमिनींची आपसांत अदलाबदल केली व मोबदला देताना आपापसांत काही अटी ठरवून घेतल्या. याबाबत कोणताही कायदेशीर दस्त न करता, केवळ तोंडी मोबदला करून अर्जावरून तलाठ्याकडून नोंद करून घेतली.

भारतीय नोंदणी कायद्याच्या कलम १७ नुसार १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृतच असला पाहिजे. तसा तो नसल्यामुळे दीनानाथच्या मुलांनी अपील केले. अपील दाखल केल्यानंतर काही दिवसांनंतर निकाल मिळाला तेव्हा ती नोंद रद्द झालेली आहे, असे त्या निकालात नमूद करण्यात आले होते.


दीनानाथ व रंगनाथ या दोघांनाही या कायद्याची कल्पना नसल्यामुळे तसेच त्यांनी रजिस्टर अदलाबदल दस्त न करता, केवळ अर्जावर आणि तोंडी मोबदला करून अर्जावरून तलाठ्याकडून नोंद करून घेतली होती. त्यात या दोघांचेही नुकसान झाले होते. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा कोणताही दस्त हा नोंदणीकृतच असला पाहिजे.

शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com