Onion Seedling : खानदेशात कांदा रोपांना अल्प मागणी

Onion Market : खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. पण यंदा पाऊस कमी राहिल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारात कांदा लागवड कमी होईल.
Onion seedlings
Onion seedlingsAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. पण यंदा पाऊस कमी राहिल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारात कांदा लागवड कमी होईल. सध्या कांदा रोपवाटिकांमध्ये रोपांची विक्री सुरू आहे. परंतु या विक्रीस शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.

यंदा जुलै आणि ऑगस्टमध्येही कांदा लागवड कमी झाली होती. पावसाअभावी हजारांवर एकर शेतजमिनी कांदालागवडीअभावी पडून होत्या, आहेत. धुळे, नंदुरबार व जळगावात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. कमी पावसाचा परिणाम रब्बीतील कांदा लागवडीवर होताना दिसत आहे.

धुळ्यात रब्बीतील कांद्याचे क्षेत्र ४० टक्क्यांनी घटले आहे. जळगाव जिल्ह्यातही कांदा लागवड कमी होत आहे. ज्यांनी कांद्याचे रोप वाढविले, ते रोप विक्रीसाठी तयार आहे. परंतु अनेक जण लागवड कमी करीत असल्याने रोपे विक्रीस कमी प्रतिसाद आहे. धुळ्यात कांद्याचे धुळे आणि साक्री तालुक्यात, जळगावात यावल, चाळीसगाव, चोपडा भागात मोठे उत्पादन घेतले जाते.

Onion seedlings
Onion Export Ban : ग्राहकहितासाठी कांदा उत्पादकांचा बळी

धुळ्यातील न्याहळोद, कापडणे, देवभाने, सरवड, नंदाणे, बुरझड, बोरीस, निकुंभे, लामकानी, दुसाणे, निजापूर, जैताणे हा कांदापट्टा म्हणून ओळखला जातो. या भागासह खानदेशात विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी घटत चालली आहे. याचा परिणाम कांदा व भाजीपाला पिकांच्या लागवडीवर झाला आहे.

Onion seedlings
Onion Market : कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या

खानदेशात वांगी, कोबी, गिलके, मुळा, कारली, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाल्याचे उत्पादनही अधिक घेतले जाते. पण पाण्याची उपलब्धता घटली आहे. भाजीपाला क्षेत्रही होत आहे. यामुळे पुढे खानदेशात भाजीपाला उत्पादन कमी होईल, असेही संकेत आहेत.

रोपवाटिकांची संख्याही कमी

खानदेशात खरिपाच्या तुलनेत रब्बीत कांद्याची लागवड अधिक प्रमाणात होते. शेतकरी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कांद्याचे बियाणे रोपवाटिकांत टाकतात. यंदा रोपवाटिकांदेखील कमी आहेत. रोपवाटिकेत एक, दीड महिन्यात रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. मध्यंतरी कांदा दरात सुधारणा झाली, पण आता निर्यातबंदीने अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी रोपे तयार केली आहेत. पण लागवडीसंबंधी तयारी नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com