Kharip Season Solapur agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Season Solapur : सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढलं, ठेवणीतल्या युरियाही केला खुला

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दोन हजार ८०० टन युरियाचा साठा खुला केला आहे.

sandeep Shirguppe

Solapur Kharip Season : सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दोन हजार ८०० टन युरियाचा साठा खुला केला आहे. तर उर्वरित साठाही लवकरच खुला करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सरासरीच्या १२१ टक्के खरीप पेरणी झाली आहे. जिल्ह्याची खरीप पेरणीची सरासरी चार लाख २१ हजार १९८ हेक्टर असून यंदा सर्वाधिक पाच लाख १२ हजार ८९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दोन हजार ८०० मेट्रिक टन साठा खुला केला आहे. उर्वरित साठाही खुला केला जाईल. सोलापूर, पढरपूर मालधक्क्यावरुन खत वाहतूक सुरू आहे. कुर्डुवाडीतील हमालीचा विषय मिटल्याने तेथूनही खत वाहतूक सुरू झाल्याने जिल्ह्यातील खत पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

संरक्षित युरियाचा साठा खुला करण्याची शेतकरी व विक्रेत्यांची मागणी होती. त्यावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे संरक्षित खतसाठा खुला करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला होता.

खरीप हंगाम हा ३० ऑगस्टपर्यंत असतो. त्यासाठी जिल्ह्याकरिता नऊ हजार ६२० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा आहे. त्यातील तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरिया खुला करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने २८०० मेट्रिक टन युरिया खुला केला आहे. उर्वरित साठाही लवकरच खुला करण्यात येणार आहे.

कुर्डुवाडी मालधक्क्यावर खत

हमाली वाढवून देण्याच्या माथाडी कामगार संघटनेच्या मागणीमुळे कुर्डुवाडीतील मालधक्का गेल्या महिनाभरापासून बंद होता. महाराष्ट्रात सर्वाधिक ३०० रुपयांचा हमाली दर असतानाही या ठिकाणच्या कामगारांची त्यात ७० रुपये वाढ करण्याची मागणी होती.

त्यामुळे ते परवडत नसल्याने विविध खत कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याचे सुमारे ५० हजार मेट्रिक टन खत अन्य जिल्ह्याकडे वळविले होते. त्यामुळेही जिल्ह्यात खतांची टंचाई जाणवत होती. कामगारांनी ३०० रुपये हमाली मान्य केल्याने कंपन्यांनी या धक्क्यावर खत आणण्यास सुरवात केल्याने जिल्ह्याला वेळेवर खत पुरवठा होण्यास आणि टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT