Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Kharif Season : यंदाच्या हंगामात २ लाख ४७ हजार ५४७ हेक्टर पेरणीसाठी नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी सुरु केली आहे. यंदाच्या हंगामात २ लाख ४७ हजार ५४७ हेक्टर पेरणीसाठी नियोजन करण्यात आले आहे. खते आणि बियाणे कमी पडणार याची काळजी कृषी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यात अकरा भरारी पथकांनी नियुक्ती केली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील ६७७ गावात सुमारे २ लाख ४७ हजार ५४७ हेक्टर इतके खरिपाचे क्षेत्र आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरणी पूर्व मशागती सुरु आहेत. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पेरणीसाठी राने तयार झाली आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शिराळा आणि काही भागात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. तर दोन दिवसापूर्वीही पाऊस झाला.

त्यामुळे शेतकरी आगाप सोयाबीन पेरणीसाठी नियोजन करत असल्याचे चित्र आहे. तर शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पेरणीचे नियोजनही शेतकऱ्यांनी केले आहे. कृषी विभागाने खते आणि बियाणांची मागणीही केली असून २९ हजार २९९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरु झाला आहे.

हंगामासाठी १ लाख ८१ हजार २०२ मे. टन खताची मागणी केली आहे. गत खरीप हंगामात १ लाख ११ हजार १८१ टन खताचा वापर झाला होता. यंदा खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने मुबलक प्रमाण खताची मागणी केली आहे. बनावट खते, आणि अप्रमाणित बियाणे विक्री होवू नये यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.

त्यानुसार जिल्ह्यात अकरा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांना कृषी सेवा केंद्राची तपासणी करुन दिले असून अप्रमाणित बियाणे, बोगस खते, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील आत्तापर्यंत बियाणे आणि खत १५० विक्रेत्यांची तपासणी केली आहे.

सोयाबीनसाठी ‘घरचं बियाणे वापरा’

येत्या खरीप हंगामात सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत ‘घरचे बियाणे’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून, गावपातळीपर्यंत या मोहिमेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; जेणेकरून सोयाबीन बियाणे खरेदीमधील शेतकऱ्यांची रक्कम वाचून अधिकाधिक क्षेत्र या पिकाखाली आणण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT