Agriculture Inspection Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inspection: पुणे जिल्ह्यात बोगस निविष्ठांवर कृषी विभागाची करडी नजर 

Fake Seeds: खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी जिल्हा कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

Team Agrowon

Baramati News: खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी जिल्हा कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत. बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी तालुकास्तरावर १३ आणि जिल्हास्तरावर २, अशा एकूण १५ भरारी पथकांनी तपासणी मोहीम तीव्र केली आहे.

या मोहिमेदरम्यान गंभीर अनियमितता आढळलेल्या १० वितरकांचे परवाने निलंबित केले असून, यामध्ये खतांचे ५, कीटकनाशकांचा १ आणि बियाण्यांचे ४ परवाने समाविष्ट आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली.

कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनेक अनियमितता उघड झाल्या. काही वितरकांनी विक्री परवान्यामध्ये उगमपत्राचा समावेश न केल्याचे, जादा दराने विक्री केल्याचे, नोंदणी प्रमाणपत्रांचे वेळेत नूतनीकरण न केल्याचे, शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावल्याचे, तसेच शेतकऱ्यांना पक्की बिले न दिल्याचे आढळले.

या सर्व बाबी बियाणे अधिनियम १९६६, खत (नियंत्रण) आदेश १९८५ आणि कीटकनाशके अधिनियम १९६८ यांचे उल्लंघन करणाऱ्या असल्याने संबंधित वितरकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची पुनर्रचना केली आहे. ही समिती बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या निकृष्ट दर्जा, अवाजवी दराने विक्री, साठेबाजी किंवा पावती न देण्याच्या तक्रारींचे ८ दिवसांत निराकरण करेल. शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यासाठी आम्ही तालुका आणि जिल्हास्तरावर भरारी पथकांमार्फत सतत तपासणी करत आहोत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आणि खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे, तसेच साठ्याची वैधता आणि दरपत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. बोगस निविष्ठांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT